✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.25 ऑगस्ट) :- रक्तदान हेच जीवनदान या भावनेला प्रेरणा देणारा आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव करून देणारा भव्य रक्तदान शिबिराचा उपक्रम 25 ऑगस्ट रोजी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, महागाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनराज निळे, शिवसेनेचे राजू राठोड आणि प्रगतिशील महिला शेतकरी लक्ष्मीताई पारवेकर यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिर घेण्यात आले. हा उपक्रम प्रजापिता ब्रह्मकुमारी सेवा केंद्र महागाव व राजयोग एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला आहे.
विश्वबंधुत्व दिवस आणि राजयोगिनी दादी प्रकाश मनीजी यांच्या अठराव्या पुण्यतिथीचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरातून एक लाख युनिट रक्तसंचलन करण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प करण्यात आला आहे.
या अभियानात शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना, पत्रकार संघटना, डॉक्टर्स असोसिएशन तसेच इतर सेवाभावी संस्था मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहे. या रक्तदान शिबिरामध्ये 31 रक्तदात्यांनी रक्तदान दिले आहे. या शिबिरासाठी मोठ्या प्रमाणात युवक कार्यकर्ते, रक्तदाते उपस्थित होते. रक्तदान ही केवळ वैयक्तिक मदत नसून राष्ट्र सेवेचा एक भाग आहे.
आपण दिलेले रक्त कुणाच्या तरी आयुष्याची आशा बनू शकते, या भावनेने प्रेरित होऊन हा उपक्रम आयोजित करण्यात आला. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना धन्यवाद देत राष्ट्राच्या विकासात हातभार लावल्याने त्यांना यावेळी प्रजापिता ब्रह्मकुमारी सेवा केंद्र महागावच्या वतीने धन्यवाद देण्यात आले.







