✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)

महागाव(दि.23 ऑगस्ट) :- जुने महागाव येथील हनुमान मंदिरात श्रावणमास समाप्तीचे औचित्य साधत भक्तागणासाठी महाप्रसादाचे कार्यक्रम पार पडला. हनुमान मंदिर समितीच्या वतीने महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. शहरातील बहुसंख्य हनुमान भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.
श्रावणमास समाप्ती महाप्रसाद कार्यक्रमासाठी यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा महागाव तालुका जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष संभाजीराव दादा नरवाडे, यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल नरवाडे, महागाव नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष तथा आरोग्य सभापती प्रमोद भरवाडे, महागाव शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा नगरसेवक शैलेश कोपरकर, युनियन बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी शिवाजीराव डाखोरे यांनी या वेळी महाप्रसाद कार्यक्रमाला उपस्थित राहून हनुमानजीचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.
या वेळी मंदिर समितीच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी गावातील जेष्ठ नागरिक मुख्य मानकरी तथा हनुमान संस्थांचे अध्यक्ष भगवानराव पाटील नरवाडे, देविदासराव गाडबैले मुख्यपुजारी, गायकवाड गुरुजी, महागाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष विलासराव संभाजीराव नरवाडे, संचालक अमर पाटील नरवाडे,नित्यानंद नरवाडे, संचालक सुरेश पाटील नरवाडे,मानकरी नितीन विजयराव नरवाडे,पुंडलिक कुसंगवाड, बंडू इंगळे यांचे सह शहरातील महिला मंडळ, भाविक भक्तांनी उस्फूर्तपणे महाप्रसाद घेण्यासाठी उपस्थिती दर्शविली होती.







