निजधाम आश्रमचे अध्यक्ष वानखेडे गुरुजींचा 85 वा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी) 

महागाव(दि.20 ऑगस्ट) :- निजधाम आश्रम शाळा मुडाणा येथे मंगळवारी 19 ऑगस्ट रोजी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पी.बी. वानखेडे गुरुजींचा संस्थेच्या प्रांगणामध्ये 85 वा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. वानखेडे गुरुजीवर मनापासून प्रेम करणाऱ्या शेकडो च्याहत्यांच्या उपस्थितीत सपत्नीक अभिष्टचिंतन करण्यात आले. प्रसंगी सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी निजधाम आश्रम शाळेचे संचालक सदानंद पाटील हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प. तानाजी बापू,अशोक वानखेडे, सरपंच वैभव बरडे यांची उपस्थिती होती.

   कार्यक्रमाच्या सुरवातीस स्व.श्री.संत एकनाथ महाराजांच्या प्रतिमेचे पूजन तथा पुष्पहार अर्पण मान्यवर मंडळींनी आणि सत्कारमूर्ती वानखेडे गुरुजींच्या हस्ते करण्यात आले. गुरुजींच्या 85 व्या अभिष्टचिंतन सोहळ्याची सुरुवात निजधाम आश्रम शाळेच्या विद्यार्थीनींच्या स्वागत गीतांने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि उपस्थिती सर्व मान्यवर आणि सर्व पाहुणेमंडळींचे यावेळी स्वागत करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक सावंत यांनी केले. मंगळवारी वानखेडे गुरुजींसाठी 85 वा अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. महान व्यक्तिमत्व,ऋषितुल्य पी.बी.वानखेडे गुरुजींचा सर्वांच्या साक्षीने यथोचित सन्मान तथा त्यांच्या कार्याचा गौरव करणारे ‘सन्मानपत्र’ त्यांना प्रदान करून सपत्नीक आहेर करण्यात आला. या अभिष्टचिंतन सोहळ्यामध्ये गुरुजींनी 85 व्या वर्षात पदार्पण केल्याचे औचित्य साधत चहात्यांनी त्यांना शुभेच्छा देऊन आनंदोत्सव साजरा केला.

अभिष्टचिंतन सोहळ्याला संस्थेचे संचालक देवानंद वानखेडे,दिलीपराव तरटे,अनिल खंदारे,राम ठाकरे,तर प्रमुख उपस्थितीती मध्ये गणपतजी डाखोरे,दिपचंद बांडे,बाभळे, बाजीराव पाटील,गजानन मुधोळ, अतुल येणकर,अंबादास पाटील, आबासाहेब येणकर,गजानन वानखेडे,वामन येणकर,प्रकाश कदम,अशोक येणकर,अनिल मिस्त्री,आत्माराम इंगळे,भाऊसाहेब ठाकरे,अनिल डहाळे,मयूर काळे,प्रवीण राजूरवाडे,विपुल धोंगडे,बाळासाहेब जाधव,हरीश सोळंके,विनोद येणकर,सतिष शिंदे, निजधाम आश्रम विद्यालयाचे शिक्षक वृंद तथा शिक्षिकाभगिनी,शिक्षकेत्तर कर्मचारी तसेंच डॉ.गायत्री आसोले यांची उपस्थिती होती. या प्रसंगी डॉ. गायत्री आसोले यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करतांना ‘आपले आरोग्य आपला हक्क’ याबद्दल परिपूर्ण मार्गदर्शन करून आहार विहार या बद्दल विशेष मार्गदर्शन केले. बऱ्याच विद्यार्थिनींनी आरोग्य विषयक प्रश्न विचारले. त्यांनी मुलींना परिपूर्ण आजाराविषयी मार्गदर्शन करून समाधान केले.

सतीश जाधव यांच्या मार्गदर्शनात हा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाअंती सर्व मान्यवरांना, विद्यार्थ्यांना पोषक खाऊचे वाटप करून कार्यक्रमची सांगता झाली. सूत्रसंचालन जांबुतकर यांनी केले तर आभार प्रदर्शन बोरकर यांनी मानले.