पुसद येथे वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्काराचे वितरण

🔸प्रयोगशील शेतकरी व कृषी शास्त्रज्ञ सन्मानित

🔹राज्याच्या जडणघडणीत वसंतराव नाईक साहेबांचा अत्यंत मोलाचा वाटा ; पालकमंत्री संजय राठोड

✒️विश्वनाथ महामुने पुसद( विभागीय प्रतिनिधी)

पुसद(दि.19 ऑगस्ट) :- वसंतराव नाईक मुख्यमंत्री असतांना त्यांचा विकासाचा केंद्रबिंदू शेतकरी होता. शेतकऱ्यांना समोर ठेवून ते धोरण आखायचे. त्यांना सुखी संपन्न करण्यासाठी त्यांनी वेगवेगळी धोरणे आखलीत. शेती, सिंचन विविध उद्योग असे राजाच्या विकासासाठी त्यांनी सर्व काम केले. राजाच्या जडणघडणीत त्यांचा अतिशय मोलाचा वाटा आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

  बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालय पुसद येथील वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार वितरण प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पालकमंत्री बोलत होते. कार्यक्रमास पुरस्कार वितरण सोहळा समितीचे स्वागत अध्यक्ष तथा राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आ. बाबूसिंग महाराज, आ. किसन वानखेडे, माजी आमदार संदीप धुर्वे, विजय खडसे, निलय नाईक, खाजा बेग, महाराष्ट्र राज्य हाऊसिंग फायनान्स कार्पोरेशनचे अध्यक्ष वसंत घुईखेडकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ययाती नाईक, डॉ. टी. सी. राठोड, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष धनंजय सोनी, दीपक आसेगांवकर, अँड. आशिष देशमुख, महंत जितेंद्र महाराज आदींची यावेळी उपस्थीती होती.

पालकमंत्री संजय राठोड व मान्यवरांच्या हस्ते शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राज्याच्या विविध भागातील प्रयोगशील शेतकरी व कृषी शास्त्रज्ञांचा वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये विनोद संपतराव तोडकर कासेगाव जिल्हा सांगली, जनार्दन संतराम अडसूळ तरडगाव जिल्हा सातारा, रमाकांत काशिनाथ बागुल कुसुंबा जिल्हा धुळे, वंदना प्रभाकर पाटील पळसखेडा जिल्हा जळगाव, दादासाहेब दौलतराव शिंदे शिंदवणे जिल्हा छत्रपती संभाजीनगर, बालाजी दत्तराव महादवाड डोंगरगाव जिल्हा नांदेड, कुंदन देवराव वाघमारे गीताई नगर जिल्हा वर्धा, नरसिंग थावरा जाधव जवळा जिल्हा यवतमाळ या शेतकऱ्यांचा समावेश आहे. तसेच कृषी शास्त्रज्ञांमध्ये मध्यवर्ती संशोधन केंद्र पाडेगाव जिल्हा सातारा येथील वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. दत्तात्रय साहेबराव थोरवे, पुरस्कार एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीचे प्रा. निलेश अशोक नलावडे, समाज माध्यम शेतकरी मार्गदर्शक पुरस्कार बालिंगे जिल्हा कोल्हापूर येथील सागर बापू कोपडेंकर यांना देण्यात आला. या वेळी वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान मध्ये केलेल्या उल्लेखनीय कामासाठी प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष दीपक आसेगांवकर व माजी प्राचार्य डॉ. उत्तम रुद्रवार यांना सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

वसंत वैभव स्मरणिकेचे प्रकाशन

सुरुवातीस वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर पालकमंत्री व अन्य मान्यवरांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या कार्यावर आधारित वसंत वैभव या स्मरणिकेचे प्रकाशन पालकमंत्री, युवा मान्यवरांच्या हस्ते झाले. प्रा. दिनकर गुल्हाने यांनी स्मरणिकेचे संपादन केले

कार्यक्रमाचे संचालन डॉ. माधवी गुल्हाने व प्राध्यापक संजय चव्हाण यांनी केले. आभार प्रा. गोविंद फुके यांनी मानले. कार्यक्रमात शेतकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.