🔸पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत अकरा लाखाचा धनादेश सुपूर्द
🔹नितीन भुतडा यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती
✒️विश्वनाथ महामुने उमरखेड विभागीय प्रतिनिधी
उमरखेड(दि.19 ऑगस्ट) :- 21 ऑगस्ट रोजी उमरखेड शहरात होणाऱ्या दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी मराठी नटी सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील यांच्या बहारदार कार्यक्रमाचे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात दहीहंडी फोडल्या जाणार होती. ही दहीहंडी लाख दोन लाख नाहीतर 11 लाखाची होती. परंतु 16 आणि 17 ऑगस्ट रोजी जिल्ह्यामध्ये सर्वत्र अतिवृष्टी झाल्याने हाहाकार उडाला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे यवतमाळ जिल्हा समन्वय नितीन भुतडा यांनी तातडीने आज 19 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेऊन सदर दहीहंडीच्या प्रसंगी आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती दिली.
संपूर्ण जिल्ह्यात 16 आणि 17 ऑगस्ट रोजी प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने नैसर्गिक संकट ओढवले आहे. या मुळे शेतशिवारातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले.आणि ग्रामीण भागातील अनेक रहिवाशांच्या घरामध्ये पुराच्या पाण्याने कहर केला आहे. परिणामी जनजीवन विस्कळीत झाले आहे.
शेतकऱ्यांच्या शेतशिवारातील कधी नव्हे एवढे प्रचंड शेत पिकांचे नुकसान झाले आहे. शासनामार्फत राज्यात पूरग्रस्तांना मदत मिळणे अनिवार्य झाले आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी जिल्ह्यामध्ये 21 ऑगस्ट गुरुवारी उमरखेड येथे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा समन्वयक नितीन भाऊ भुतडा आणि मित्र मंडळांनी दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या दहीहंडी कार्यक्रमाला नृत्यांगना गौतमी पाटील हजेरी लावणार होत्या. या कार्यक्रमाला अकरा लाख रुपये खर्च अपेक्षित होता. सध्या सर्वत्र अतिवृष्टीने शेतकरी, शेतमजूर कमालीचे हैराण झाले आहेत.
या मुळे अशा परिस्थितीमध्ये 11 लाखाची लावणी कार्यक्रम घेणे उचित ठरणार नव्हते. जनतेच्या मनामधील रोष पाहता, अशा परिस्थितीमध्ये होत असलेल्या कार्यक्रमासाठी दिलगिरी व्यक्त होत होती. परिणामी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा समन्वयक नितीनजी भुतडा यांनी दूरदृष्टीने विचार करीत आज 19 ऑगस्ट रोजी उमरखेड येथे तातडीची पत्रकार परिषद घेत 21 ऑगस्ट रोजी होणारा दहीहंडी प्रसंगीचा 11 लाखाचा खर्च टाळून दहीहंडी कार्यक्रम रद्द झाल्याचे जाहीर केले. त्यांनी यावेळी 11 लाख 11 हजार 111 रुपयाचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यात आल्याची या वेळी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.







