✒️ सौ. सुवर्णा बेले राजुरा (Rajura प्रतिनिधी)
राजुरा(दि.16 ऑगस्ट) :- ॲड.यादवराव धोटे महाविद्यालय, राजुरा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी ठिक 7:30 वाजता कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे संस्थेचे उपाध्यक्ष तथा राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार ॲड. संजय धोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी त्यांनी उपस्थित सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि लगेचच राज्यगीत घेण्यात आले.कार्यक्रमांतर्गत थोर नेत्यांच्या प्रतिमांचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित तीन दिवसीय उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी विविधरंगी व आकर्षक रांगोळ्यांद्वारे आपली कला सादर केली होती या रांगोळी स्पर्धेचा विषय स्वातंत्र्यावर आधारित असा होता या स्पर्धेचा निकालही येथे जाहीर करण्यात आला रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक दिक्षा बालाजी डेंगळे, द्वितीय क्रमांक साक्षी दिवाकर ठावरी, तृतीय क्रमांक निकिता रवींद्र फुसाटे यांनी पटकाविला तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर आधारीत गाण्यावर संगीत कवायत संचलनात सुद्धा उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या प्रसंगी संस्थेचे सचिव डॉ.अर्पित धोटे, वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या मीनाक्षी कालेश्वरवार, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या वर्षा पोडे, पर्यवेक्षक प्रा. इर्शाद शेख, अमेय धोटे, बाबू जैन,अभिलाष धोटे, सतीश गिरसावळे,नारायण बोरकुटे,प्रमोद वडस्कर, कृषक स्वराजचे सतीश गिरसावळे महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख तसेच अन्य मान्यवर, पालक वर्ग तसेच प्राध्यापक व कर्मचारी वृंद आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या वर्षा पोडे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रा.धनंजय डवरे यांनी मानले.







