🔹१२ जणांची जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता निवड
✒️ सौ.सुवर्णा बेले राजुरा (Rajura प्रतिनिधी)
राजुरा (दि.13 ऑगस्ट) :– इन्फंट जीजस सोसायटी संचालित इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल, राजुरा येथील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय क्रीडा आणि शैक्षणिक स्पर्धांमध्ये आपली दमदार छाप उमटवत विजयाची पताका फडकावली आहे. विशेषतः बुद्धीबळ स्पर्धेत विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक खेळी करत तब्बल १२ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यामध्ये १४ वर्षांखालील गटातून – आयुष येरणे, कु. रश्मी देशमुख, १७ वर्षांखालील गटातून – कार्तिक रामटेके, कु. प्रिन्सि बाराई, १९ वर्षांखालील गटातून – ओम चन्ने, आर्या येरणे, सोहम घट्टुवार, अर्णव पोडे, कु. ऋत्विका सुदामल्ला, लहेर लेखराजनी, श्रावणी उराडे यांची जिल्हास्तरीय निवड झाली आहे. याशिवाय ग्रीको-रोमन ओपन स्टाईल कुस्तीमध्येही शाळेच्या खेळाडूंनी सुवर्णयश संपादन केले. ५५ किलो गटात – ओम काळे यांनी, ६० किलो गटात – कैफ खान यांनी प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय स्पर्धेचे तिकिट मिळवले आहे.
उल्लेखनीय कामगिरी करून विद्यार्थ्यांनी क्रीडासोबतच शैक्षणिक क्षेत्रातही शाळेचा विजयाचा झेंडा उंचावला आहे. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन सेमिनारमध्ये कु. मालवीया मुस्तकीन हुसैन हीने तृतीय क्रमांक पटकावला. हिची सुद्धा जिल्हास्तरीय प्रदर्शनीसाठी निवड करण्यात आली आहे.
या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करत संस्थापक व माजी आमदार सुभाष धोटे, संस्थेचे सचिव व माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, अध्यक्ष अभिजीत धोटे, मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी तसेच क्रीडा शिक्षक पुंडलिक वाघमारे, हर्षल क्षीरसागर आणि सर्व शिक्षकवृंद यांनी हार्दिक अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.







