तहसील कार्यालयात महाराजस्व अभियान संपन्न 

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon प्रतिनिधी) 

महागाव(दि.4 ऑगस्ट) :- महसुल सप्ताह निमित्य 4 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालय महागाव येथील सभागृह मध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान आयोजित करण्यात आले होते. या अभियान कॅम्पमध्ये नागरिकांना विविध दाखले, इतर शासकीय प्रमाणपत्रे, शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. ‌ 

  या वेळी तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार अभय मस्के, मंडळ अधिकारी महागाव राम पंडित, ग्राम महसूल अधिकारी दीपक दिवेकर, अनिल खडसे, सिमा कदम, निता मनवर, सुमित्रा बोक्षे महसूल सेवक शंकर चव्हाण, सदानंद जराड, प्रवीण वाहूळे, किशोर पवार तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी, पुरवठा विभागाचे लखन चव्हाण, संजय गांधी निराधार योजनेचे महादजी तिडके, सहाय्यक महसुल अधिकारी अनिल वैद्य,तसेच गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

फुलसावंगी या ठिकाणी पण महाराजस्व अभियान संपन्न झाले. महसुल सप्ताह निमित्य 4 अगस्ट रोजी तहसील कार्यालय महागावच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान आयोजीत करण्यात आले होते. या अभियान कॅम्पमध्ये नागरिकांना विविध दाखले, इतर शासकीय प्रमाणपत्रे, शासकीय योजनांची माहिती देण्यात आली आहे. शासकीय कार्यालयात लागणारे डॉक्युमेंट्स सुलभ रीतीने नागरिकांना मिळतील हा या अभियानाचा उद्देश होता.

ग्राममहसूल अधिकारी एम.एम. शेख, सदानंद भुरके, विनोद ढोणे, प्रज्ञा लव्हाळे, अर्चना बोंबले, महसूल सेवक शंकर चव्हाण, पूजा सुकळकर, केशव मोहिते, विजय पोटे, दीपक वैरागडे, नितीन देवसरकर तसेच वैद्यकीय अधिकारी व त्यांचे कर्मचारी, ग्राम पंचायत अधिकारी चव्हाण, शालेय विद्यार्थी फुलसांगवी गावचे उपसरपंच कुणाल नाईक आणि गावातील बहुसंख्येने नागरिक या प्रसंगी उपस्थित होते.