शेतकऱ्यांना पांदण रस्ते मोकळे करून द्या

🔸देश विकासासाठी समृद्धी महामार्ग जेवढा महत्त्वाचा,तेवढेच पांदनरस्ते खुले होणे देशहितासाठी महत्वाचे 

✒️विश्वनाथ महामुने महागांव (Mahagaon प्रतिनिधी)

महागाव(दि .2 ऑगस्ट) :- तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यासाठी मोकळे पांदण रस्ते नाहीत. परिणामी आता शेतकऱ्यांना आपल्या शेतीत बी- बियाणे,खते आणि शेतातील शेतमाल मार्केटला आणण्यासाठी पक्केरस्ते महत्त्वाचे आहेत. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या पांदण रस्त्याचा प्रलंबित प्रश्नांसाठी प्रशांत गावंडे यांच्या नेतृत्वात महागाव तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पांदण रस्त्याचा प्रश्न निकाली लागावा या साठी राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे मागणी करण्यात आली.

  विकसित देशासाठी राज्य महामार्ग महत्त्वाचे मानले जाताहेत, तसे शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्यासाठी पांदनरस्ते खुले होणे अतिशय महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांच्या रस्त्यांना क्रमांक दिले जातील. राज्याच्या बांधकामासाठी नवीन योजना आणली जाईल. राज्यात जसा समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, शक्तिपीठ महामार्ग महत्त्वाचा आहे, तेवढेच पांदनरस्ते आणि शेतरस्ते महत्त्वाचे आहेत.सरकार शेतकऱ्यांसाठी रस्ते संदर्भात ठोस उपायोजना राबविण्याच्या विचाराधीन आहे. विविध रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करत, समृद्धी महामार्गानंतर महागाव तालुक्यामधून शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे. त्या संदर्भात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 

रस्ते कोणतेही असो समृद्धी महामार्ग किंवा राज्यमहामार्ग असो त्या प्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतात जाणारे पांदनरस्ते, शेतरस्ते होणे सुद्धा अतिशय महत्वाचे आहे.

अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेले पांदण रस्ते मोकळे नाहीत. परिणामी पावसाळ्यात अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये जाण्यासाठी आडचणीचा सामना करावा लागतो.चिखलातून वाट तुटवत जातांना अक्षरशः कसरत करावी लागते. महागाव तालुक्यांत 275 पांदण रस्त्यापैकी केवळ 56 पांदनरस्ते मोकळे झालेत. उर्वरित 219 पांदण रस्ते अजूनही अतिक्रमणाच्या विळख्यात अडकली आहेत.

या पांदणरस्त्या संदर्भात ठोक भूमिका घेऊन पांदणरस्ते मोकळे करून त्यावर पक्की उपयोजना करून शेतकऱ्यांच्या पांदणरस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा. या संदर्भात तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी अभय मस्के यांच्या मार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदनातून पांदणरस्ते खुले होण्याची मागणी करण्यात आली. यावेळी उटी येथील शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गावंडे,शेतकरीनेते कॉम्रेड एड. डी. बी. नाईक, काँग्रेस कमिटीचे महागाव तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, बोथा येथील सरपंच्या यशोदा गायकवाड,अशोक तुमावार, संतोष मोरे, सुरेश खिल्लारे, राजू मोरे, सचिन मस्के, प्रल्हाद कवडे, विजय गायकवाड, गजानन लांडे, संतोष चिंचोलकर, हनुमान मदने, बालाजी बोखारे, शब्बीरखा अन्वरखा पठाण, दिनेश डोंगरे, प्रकाश व्यवहारे , अमोल पाईकराव तसेच उटी, बोथा ,भांब, शिरपूर कासारबेळ, सवना येथील शेतकऱ्यांनी या वेळी सामूहिक निवेदन दिले.