Study point ACADEMY Warora तर्फे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन (सेमिनार) आयोजित

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.27 जुलै) :- 

आनंदवन वरोरा येथे Study point ACADEMY तर्फे स्पर्धा परीक्षेबाबत स्वतंत्र सेमिनार रविवार दिनांक 27 जुलै 2025 रोजी स्टडी पॉईंट अकॅडमीच्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आला.

 कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री नवीन गुप्ता सर, लेखापाल व लेखापरीक्षक नगर विकास विभाग नागपूर हे असून यांनी संपूर्ण अभ्यासाची रणनीती तसेच विषयाची विभागणी करून मांडणी करण्याबाबतचा संपूर्ण मार्गदर्शन केले.

 कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे श्री नरेंद्र कन्नाके सर हे देखील उपस्थित होते, विद्यार्थ्यांच्या गोल निश्चितीकरणाकरिता त्यांनी मार्गदर्शन केले व अभ्यासात निरंतरता कशी राखावी याबाबत सांगितले.

 कार्यक्रमाची आखणी व नियोजन तसेच मार्गदर्शन नीलिमा मॅडम तर्फे करण्यात आले व सामोर देखील विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकरिता व यश प्राप्त करण्याकरिता सामोर देखील असे कार्यक्रम नेहमी आखण्यात येईल याबाबतचे मार्गदर्शन केले 

 स्टडी पॉईंट अकॅडमीची फॅकल्टी असलेले प्राध्यापक राऊत सर यांनी विद्यार्थ्यांना गणित व बुद्धिमापन चाचणी या विषयावर प्रत्यक्ष लाईव्ह क्लास घेऊन विशिष्ट मुद्द्याचे विश्लेषण करून मुद्दा कसा सोप्या भाषेत मांडता येतो हे प्रात्यक्षिकाद्वारे करून दाखविले.

 स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सेमिनार मध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला त्याचबरोबर सकारात्मक प्रतिक्रिया देखील दर्शविल्या.