धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान मधील खेमजई गावामध्ये शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन 22 जुलाई 2025 मोठ्या उत्साहात साजरा 

✒️ वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.24 जुलै) :- 

22 जुलै, हा दिवस महाराष्ट्र शासनाने शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन म्हणून घोषित केलेला आहे त्याचे औचित्य साधून पशुवैद्यकीय चिकित्सालय खेमजई ग्रामपंचायत खेमजई आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा, कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने *_शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिनाचे_ आयोजन केले. कार्यक्रमाचे उद्घाटक नरेश जयस्वाल, अध्यक्ष डॉ प्रमोद गंपावर, प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून गावचे उपसरपंच चंद्रहास मोरे, डॉ प्रमोद जल्लेवार, डॉ बडोले, डॉ शेंद्रे, पातोंड, यशवंत सहारे, , गाजरलावार, अकोटकर,डॉ बिपटे, डॉ सोमकुवर,संजू जाभुळे, रमेश चौधरी, शंकर धोत्रे, भाऊराव दडमल उपस्थित होते. गौ पूजन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रतिमेचे पूजन व वृक्षारोपणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. सतीश अघडते (पशुवैद्यकीय अधिकारी खेमजई ) यांनी केले. 

 डॉ मुकुंद पातोंड (पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र प्राध्यापक) यांनी आपल्या भाषणातून शुद्ध देशी गाई बद्दल गावकऱ्यांना सविस्तर माहिती दिली. डॉ. प्रमोद जल्लेवार यांनी शेतकऱ्यांच्या घरातून कमी होत चाललेल्या गाई व वाढत जाणारी उपकरण यावर भाष्य केले. डॉ प्रमोद बडोले यांनी इतर गाईंच्या तुलनेत देशी गायीच्या दुधातील प्रथिनांचे प्रमाण व आरोग्यावर होणारे फायदे सांगितले.

  कांचन ऍग्रो इंडस्ट्री वरोरा चे यशवंत सहारे यांनी आधुनिक शेतीतील ड्रोन तंत्रज्ञानाबद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली. डॉ राहुल शेंद्रे यांनी पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणारे नाविन्यपूर्ण उपक्रम व शुद्ध गोवंश जतन याबद्दल माहिती दिली. खेमजई गावचे उपसरपंच चंद्रहास मोरे यांनी यांच्याकडे असलेल्या देशी गाय व बैलाचे प्रशंसा करत ग्रामगीते मधील गोवंश सुधार अध्यायाची आठवण करून दिली.अध्यक्षीय भाषणातून डॉ. प्रमोद गंपावार यांनी दूध उत्पादनात भारताने साधलेली प्रगती व पेटंट केलेले गोमूत्र व दुधाचे पदार्थ या बद्दल गावकऱ्यांना सांगितले.

  तसेच कार्यक्रमा करीता डॉ. महेश बिबटे डॉ. रोहिणी सोमकुवर ( पशुधन विकास अधिकारी ) , डॉ. सुबोध गजरलावार (पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र प्राध्यापक) डॉ. आकोटकर ( अग्री. बॉटनी प्राध्यापक) व गावातील शेतकरी, प्रगतिशील शेतकरी वर्ग, महिला, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी आदिवासी उपजीविका विकास प्रकल्पांतर्गत अनिल पेंदाम यांनी 25 प्रगतिशील गोपालकांना मुरघास वाटप केली.  

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अथर्व महल्ले यांनी केले असून कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गोपाळ मसलकर यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषिदूत खेमजई लोकेश चव्हाण, प्रेम मरचट्टीवार, ,कुंदन‌ झामरे, भूषण गावंडे, यश ढबाले, अंकुश येन्नावार, गोपाल मसलकर, भुषण गनफाडे, साहील कंदुकवार, शिवराज डुकरे, राज दसोरा, वैभव जनबंधु , वैभव चौधरी, ईश्वर हजारे , अविनाश तुराणकर, गोपाल राठोड व अथर्व महल्ले ,यांनी विशेष परिश्रम घेतले.