✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
वरोरा(दि.23 जुलै) :- शेतकरी कर्जमाफी व दिव्यांग, शेतकरी,शेतमजूर, मच्छिमार, मेंढपाळ यांच्या इतर मागण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात उद्या प्रहार जनशक्ती पक्षा कडून चक्काजाम आंदोलन उभारण्यात येणार असून चंद्रपूर नागपूर महामार्गावरील टेमुर्डा या ठिकाणी शेतकरी नेते किशोर डुकरे उपजिल्हा प्रमुख आशिष रणदिवे प्रहार विध्यार्थी संघटनेचे गणेश उराडे यांच्या नेतृत्त्वाखाली सकाळी ८ते १० वाजेपर्यंत चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक माजी राज्यमंत्री बच्चू कडू हे शेतकरी, शेतमजूर, मेंढपाळ,मच्छिमार यांच्या साठी लढा देत आहे बच्चूकडू नि रायगड येथे तीन दिवस अन्नत्याग आंदोलन केले महाराष्ट्रातील पत्रक आमदारांच्या घरासमोर टेंभा आंदोलन केले प्रत्येक आमदारांच्या मंत्राच्या घरासमोर रक्तदान केले मोझरी येथे सात दिवस अन्नत्याग आंदोलन केले.
पापड ते चिलगव्हान पाहिलं आत्महत्या झालेल्या गावापर्यंत १३८ किमी चालून सातबारा कोरा यात्रा काढली तरी सुद्धा राज्यसरकार ने शेतकरी कर्जमाफी चा निर्णय घेतला नाही या झोपलेल्या सरकार ला जाग करण्यासाठी नागपूर चंद्रपूर महामार्गावरील टेमुर्डा येथे शेतकरी व प्रहार कडून आंदोलन करणार असल्या ची माहीत बोलताना दिली या आंदोलनात सर्व पक्षीय लोक येणार असल्याची माहिती सुद्धा दिली या आंदोलना नंतरही सरकार ला जाग आला नाही तर माजी राज्यमंत्री बच्चूकडू यांच्या नेतृत्वात २ आक्टोबर ला मुंबईत ४० हजार ट्रॅक्टर घेऊन घुसू असा इशाराही या वेळेस दिला आहे.







