ग्रामीण भागात वारंवार लाईटच्या लपंडाव

✒️शेगाव बू (Shegaon bu विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क) 

शेगाव बू (दि.22 जुलै) :- 

येथून जवळच असलेला अर्जुनी तुकुम हे गाव जवळपास दोन हजार वस्तीचे आहे हे गाव ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून असुन पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वारंवार दिवस-रात्र लाईटच्या लपंडाव नेहमी असल्यामुळे जनतेला विद्युत विभागाच्या हलगर्जीपणामुळे त्रास सहन करावा लागत आहे.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पा लगत असलेल्या 2000 लोकसंख्येचं गाव या ठिकाणी नेहमीच वन्य प्राण्यांची भिती असते,पावसाळ्यामध्ये वन्य प्राण्यासहित सरपटणारे प्राणी नेहमी गावात पाहायला मिळतात, यावेळी एखादी अनुचित घटना रात्रीला घडल्यास जबाबदार कोण असा प्रश्न जनतेच्या मनात पडलेला आहे सतत पावसाळ्यात दिवसांमध्ये पंधरा दिवसापासून दिवसात तसेच रात्रोचा सुमारास वारंवार लाईट जात असल्यामुळे जनतेला प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे त्रास सहन करावा लागत आहे .

सगळीकडे शेती हंगाम असून या गावातील शेतकरी बीज पेरल्यापासून शेतामध्ये जागल करत असतात त्यातच त्यांना रात्रीचा सुमारास जावे लागते या गावाला नेहमीच पावसाळ्या दिवसांमध्ये विद्युत पुरवठा खंडित होत असुन गावातील जनतेला वंचित राहावे लागतात याकडे प्रशासन, लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष झालेले आहे.