✒️ संजय तिवारी चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर(दि.17 जुलै) :-
मुस्तकीम शफी शेख राह यांची प्रकृती बिघडली असल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालय नागभीड नेला असता त्यांनी प्रथम उपचार केला व नंतर रेफर करायला सांगितलं…
आम्ही पटकन ऍम्ब्युलन्स बोलावून पेशंट ब्राम्हपुरी क्रिस्तानंद दवाखाना येथे नेले पेशंटला स्टेचर वर टाकला त्याला फिट व झटके खूप प्रमाणात येत असल्यामुळे थोडया वेळानं डाक्टर आले आणि सांगितलं पेशंट क्रितिकल आहे. याला व्हेंटिलेटर टाकावं लागेल. डॉक्टर बोलले त्याचा बेडचार्ज 10000 रुपये आहे तुम्ही लवकर रुपये जमा करा आणि स्लिप आणा.., मी रुपये जमा केले नंतर 11700ची औषधं आणली नंतर त्यांनी मला पेशंटची शर्ट काढायला आत बोलावले आत गेल्यावर मी बोललं तुम्ही आतापर्यंत उपचार सुरु केला नाही…. त्यानी मला बाहेर जायला सांगितलं हि गोष्ट लगेच मी आपल्या नातेवाईकला सांगितले..!
डॉक्टर बाहेर आले आम्ही त्यांना विचारना केली त्यांनी सांगितलं आम्ही एक दीड तासात तुम्हाला सांगतो.
लगेच अर्धा तासात दुसरे डॉक्टर आले आणि सांगितलं की लवकरात लवकर याला लेफर करावे लागेल..
मी विचारल 11700ची औषधं व 5000 जमा केले त्याचे काय त्यांनी सांगितलं तुमची औषधं परत होणार व तुम्हाला पेशंट व्हेंटिलेटरवाल्या ऍम्ब्युलन्स न न्यावे लागेल…!
आमच्याकडे ही ऍम्ब्युलन्स उपलब्ध आहे तिचे चार्ज एकूण 17000हजार रुपये आहे ते पहिले भरावे लागेल…
मी 17000 रुपये भरलो वाचलेली मेडिसिन वापस केली फक्त 2070 रुपये वापस केले. आणि बेडचार्ज 8800 रुपये माझ्याकडून घेतले अर्ध्या तासात सुमारे मेडिसिन 9630रुपये बेडचार्ज 8800रुपये ऍम्ब्युलन्स 17000रुपये एकूण 35400 रुपये घेतले…!
आम्ही पेशंटला घेऊन वर्धा निघालो..
भिसी-गिरड मार्गावर नांद या गावाजवळ जंगलात सुमारे 11:30 वाजता रात्री ऍम्ब्युलन्स फेल झाली पेशंट क्रितीकल होत.
सोबत दोन डॉक्टर होते ते हक्काबक्का झाले इकडे तिकडे फोन करत होते… सुमारे 2:00 वाजताच्या सुमारास दुसरी ऍम्ब्युलन्स आली पहिल्या ऍम्ब्युलन्स मधून दुसऱ्या ऍम्ब्युलन्स मध्ये पेशंट शिफ्ट केले..!
4:00वाजता पहाटे ऍम्ब्युलन्स दत्ता मेघे हॉस्पिटल पोहचली..!
तब्बल 3:30 तास उशीर झाल्यामुळे पेशंटला डाव्या बाजूला प्यारालीस मारला होता व प्रकृती खूपच बिघडली होती..!
दत्ता मेघे हॉस्पिटलला पोहचल्याबरोबर पेशंटला ICU मध्ये टाकण्यात आले आणि प्रकृती बिघडन्याचे कारण फक्त आणि फक्त ऍम्ब्युलन्स फेल होणे आहे..!
नंतर दत्तामेघे हॉस्पिटल मध्ये प्रकृती अधिकच खालावल्यामुळे आम्ही पेशंटला 02/07/25 ला नागपूर AIMS मध्ये हलवले..नंतर तिथेपण पेशंटची प्रकृती खूपच बिघडली पेशंट कोमात गेला..!
शेवटी डॉक्टरानीं सांगितले कि पेशंटबाबत काहीच सांगता येत तुम्ही घरी नेऊ शकत असाल तर पेशंटला घरी नेऊ शकता त्यामुळे आम्ही पेशंटला 12/07/25 ला स्वगावी नागभीड येथे परत आणले…
नंतर 14/07/2025 ला सकाळी 7:30 वाजता पेशंटची दुर्दैवी मृत्यू झाला..!
जेव्हा तुम्ही 17000 रुपये ऍम्ब्युलन्सचा किराया घेतला आणि पेशंटला दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये पहुचविन्याची हमी दिली तर ती ऍम्ब्युलन्स रस्त्यात फेल पडली तर त्या पेशंटची प्रकृती बिघडल्यावर त्याची जिम्मेदारी कोणाची!
च्यारीती हॉस्पिटल फक्त नावाचा आहे. या हॉस्पिटल मध्ये फक्त पैसा चालतो या हॉस्पिटल वर कार्यवाही झालीच पाहिजे..!
तरी सदर घटनेची योग्य चौकशी करून क्रिस्तानंद हॉस्पिटल मधील डॉक्टरावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा







