चंद्रपूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवकांची बैठक संपन्न

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.13 जुलै) :- 

चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज माजी नगरसेवकांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष मा. श्री हंसराजजी अहिर यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत पक्ष संघटन अधिक बळकट करण्यावर भर देण्यात आला. प्रभागातील स्थानिक समस्या, कार्यकर्त्यांच्या अडचणी आणि नागरिकांच्या अपेक्षा यावर सविस्तर चर्चा झाली.

मा. अहिर यांनी उपस्थित सर्व माजी नगरसेवकांना मार्गदर्शन करत कार्यपद्धती अधिक प्रभावी करण्याचे आवाहन केले.

चंद्रपूरच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा निर्धार या बैठकीतून व्यक्त केला असून सुशासनाच्या दिशेने पावले उचलण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.