🔸 3 आरोपी ताब्यात ,पास्को अंतर्गत गुन्हा दाखल
✒️ शेगाव बु(Shegaon bu विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
शेगाव बु(दि.12 जुलै) :- शेगाव बुद्रुक पोलीस स्टेशन अंतर्गत माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे.16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करून त्याची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर वायरल केल्याची घटना उघडकीस आली आहे आज दिनांक 11 जुलै 2025 ला दुपारी दोनच्या दरम्यान पीडित मुलगी तिच्या वडिलांसोबत येऊन तक्रार दाखल केल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे ही घटना पिढीतेच्या सांगण्यावरून 24 मे रोजी घडली असून याचा व्हिडिओ बनवून आरोपीने सोशल मीडियावर वायरल केल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली आहे.
दरम्यान शेगाव बुद्रुक पोलीस यांनी या संदर्भात गुन्हा दाखल करून तात्काळ सूत्र हाती घेत तीन आरोपींना अटक केली असून त्यातील आरोपी 1) स्वप्निल राजकुमार गुर्जनवार 2) गणेश राजेंद्र विश्रामकर दोन्ही आरोपी राहणार पवनगाव (करूर) ता. समुद्रपूर जिल्हा वर्धा व 3) रोहन गजानन विश्रामकर रा. चंद्रपूर अशी तिन्ही आरोपीचे नावे असून त्यांना अटक करण्यात आली आहे. व आरोपीवर कलम 70 ( 2),123, भारतीय न्याय संहिता – 2023 सहकलम 4,6 पोस्को कायदा, सहकलम 66 (ई),67(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक यांनी खबरदारी घेत त्यावेळी कुठलीही अप्रिय घटना घडू नये यासाठी चंद्रपूर दंगा नियंत्रण पथक यांना पाचारण केले होते तसेच भद्रावती वरोरा चिमूर भिशी येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना सुद्धा पाचारण करण्यात आले होते त्यानंतर फॉरेन्सि टीम सुद्धा दाखल झाली होती.
दरम्यान या घटनेचा व्हिडिओ किंवा काही आक्षेपाहार्य फोटो सोशल मीडियावर कुणीही व्हायरल करू नये असे आवाहन पोलीस विभाग तर्फे करण्यात आले आहे असे केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव चिमूर यांनी केली आहे.
दरम्यान घटनेचा पुढील तपास चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राकेश जाधव हे करीत आहे.







