✒️ शेगाव बू (Shegaon bu विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

शेगाव बू (दि.11 जुलै) :- डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत महारोगी सेवा समिती द्वारा संचालित आनंद निकेतन कृषि महाविद्यालय वरोरा येथील सातव्या सत्रातील कृषीदुतांकडून दिनांक १ जुलै रोजी प्रार्थना मंदिर, शेगाव येथे महाराष्ट्र कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री. रवी राठोड साहेब (ता . कृ.अधिकार वरोरा) उपस्थित होते. अध्यक्षस्थानी श्री. दुधलकर सर होते, तर कार्यक्रमास ग्रामपंचायत सरपंच श्री. मोहित लभाने आणि गावातील शेतकरी यांनीही उपस्थिती लावली.
कार्यक्रमामध्ये शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, त्याचे फायदे, आणि शेतकऱ्यांनी कसे नव्या तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून उत्पादन वाढवावे यावर सविस्तर माहिती देण्यात आली. यामध्ये ड्रोन तंत्रज्ञान, सिंचनाच्यापद्धती, व पाणी व्यवस्थापन, सुधारित बियाणे, ग्रीनहाऊस,यासारख्या बाबींचा विशेष उल्लेख करण्यात आला.
शेगाव परिसरातील अनेक शेतकरी, विद्यार्थी आणि गावकरी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन अतिशय उत्तम प्रकारे करण्यात आले आणि उपस्थितांनी याचा लाभ घेतला.
या कार्यक्रमात कृषीदुत वैभव शेडामे, आदर्श पांडेय, पंकज घुगुस्कर,करण बघेले, सौरभ भांडेकर.तेजस गाडेकर, हर्षल आत्राम यांचा सहभाग होता .या कार्यक्रमाकरिता आनंद निकेतन कृषि महाविद्यालय वरोरा येथील प्राचार्य, डॉ. सुहास पोतदार, ग्रामीण कृषि कार्यानुभव प्रभारी डॉ. आर. व्ही. महाजन कार्यक्रम समन्वयक, श्री. राहुल तायडे, कार्यक्रम अधिकारी डॉ. डॉ सतीश इमडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.







