✒️शिरीष उगे भद्रावती (Bhadrawati प्रतिनिधी)

भद्रावती(दि .29 जानेवारी) :- महाराष्ट्र धनगर समाज महासंघ(प्रणित) मल्हार सेना व अहिल्या महिला संघ, जिल्हा चंद्रपूर तर्फे आयोजीत समाज प्रबोधन मेळावा व महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम रविवार दिनांक ०२ फेब्रुवारी २०२५ ला दुपारी १२ वाजता वृंदावन मंगल कार्यालय, भद्रावती येथे अयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक हंसराजजी अहीर अध्यक्ष केन्द्रीय मागासवर्ग आयोग भारत सरकार नई दिल्ली, यांच्या हस्ते होणार आहे. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रमेशराव बुच्चे जिल्हाध्यक्ष म.ध.स. महासंघ राहणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून किशोरमाऊ जोरगेवार आमदार विधानसभा क्षेत्र चंद्रपूर, बबनराव रानगे प्रदेश अध्यक्ष मल्हार सेना, विवेक बोढे भा.ज.पा. जिल्हा महामंत्री, नामदेवराव डाहुले माजी जिल्हा महामंत्री भा.ज.पा.
कार्यक्रमाचे मार्गदर्शक डॉ. अल्काताई गोडे प्रदेश अध्यक्षा अहिल्या महीला संघ, वासुदेवराव आस्कर प्रदेश उपाध्यक्ष, श्रीमती नंदाताई शेळकी प्रदेश उपाध्यक्षा अहिल्या महीला संघ, अशोकराव शेळकी माजी अध्यक्ष व सल्लागार धनगर समाज महासंघ, प्रमुख्याने उपस्थित राहणार आहे.
कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीतजास्त धनगर समाज बांधवानी उपस्थित राहण्याचे आवाहन महा. धनगर समाज महासंघ, जिल्हाध्यक्ष रमेशराव बुच्चे, अहिल्या महिला संघ जिल्हाध्यक्षा छायाताई घोरूडे, मल्हार सेना जिल्हाध्यक्ष रविंद्र काळे यांनी केले.







