सावरी (बिड) येथे तान्हा पोळा मोठ्या उत्साहात साजरा

Share News

✒️चिमूर(Chimur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चिमूर(दि .7 सप्टेंबर) :- तालुक्यातील सावरी (बिड)येथे दुर्गा माता मंडळ व समस्त गावकरी यांच्या वतीने २८ वर्षापासून सावरी गावात तान्हापोळा साजरा केला जातो. त्याचप्रमाणे याही वर्षी सावरी गावात परंपरेने चालत असलेल्या तान्हा पोळा साजरा करण्यात आला. या मध्ये २२५ नंदी सहभागी झाले होते. आनंदाने गोविंदाने हा तान्हा पोळा साजरा झाला.

लहान मुलं मुली यांनी शेतकरी , शिवाजी, गाडगेबाबा, डाॅ.आंबेडकर अशी विविध वेशभूषा प्रदान करून लाकडी नंदीला सजवून भारतीय संस्कृती जपली. या तान्हा पोळ्यात बालगोपालांना शै.साहित्य व साबन,बिस्किट वाटप करुन नवोदय विद्यालय प्रवेशित यश शेषराज ठेपाले तसेच वर्ग4, वर्ग 7,वर्ग 10,वर्ग 12 वी मध्ये प्रथम क्रमांक मिळवणारे याचा सत्कार करण्यात आला. ईश्वर चिट्टीच्या माध्यमाने तान्हापोळ्यातील बालगोपाल यांना बक्षीस देऊन नंदी बैलांना क्रमांक दिले व भरपूर असे बक्षीस वितरित करून दुर्गा माता मंदिर व समस्त गावकरी यांच्या माध्यमातून व सहकार्यातून मागील २८ वर्षांपासून भरणाऱ्या तान्हा पोळा मोठ्या आनंदाने गोविंदाने उत्साहात साजरा करण्यात आला.

 या तान्हा पोळ्यानिमित्य माकोना,गिरोला,खानगाव येथील असंख्य नागरिक उपस्थित होते.

Share News

More From Author

जिल्ह्यातील कार्यसम्राट लोकप्रतिनिधी यांनी उघडा डोळे पहा निट शेत पांदन रस्ताची वाट बिकट…प्रहार सेवक विनोद उमरे

चरुर येथे एक गाव एक गणपती उत्सव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *