चंद्रपूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा, चंद्रपूर येथे संपन्न

Share News

🔸खेळातील राजा म्हणजे बुद्धिबळ – मा. नरेन्द्र कन्नाके, आंतराराष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.26 ऑगस्ट) :- क्रियेटीव्ह चेस असोसिएशन चंद्रपूर द्वारा आयोजित चंद्रपूर जिल्हा अंडर 13 निवड बुद्धिबळ स्पर्धा दिनांक 25 ऑगस्ट 2024 ला सोमया पॉलिटेक्निक, वडगाव, जिल्हा चंद्रपूर येथे घेण्यात आली. स्पर्धेत स्पर्धकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. बक्षिस वितरण मा.श्री. अरविंद चौधरी(मुख्याध्यापक) , मा. आश्विन मुसळे ( अध्यक्ष) मा. नरेन्द्र कन्नाके ( म.राज्य आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक), कुमार कनकम यांचे हस्ते विजेत्यांना सन्मान चिन्ह व मेडल देऊन गौरविण्यात आले. सरावा शिवाय यश संपादन करता येत नाही असे बहुमूल्य मत अध्यक्ष महोदयांनी व्यक्त केले.

      ही स्पर्धा निवड स्पर्धा होती. अंडर 13 बुद्धिबळ स्पर्धा मधून 2 मुले व 2 मुली राज्य स्तरीय बुद्धिबळ स्पर्धा करीता निवड करण्यात आली. 

अंडर 13 मुली मधे परिनिता अर्डे प्रथम, आभा फलके द्वितीय, इशिका सहारे तृतीय, तर अंडर 13 मुला मधे निहान पोहाने प्रथम, समर्थ पैठने व्दितीय, हेरंब निर्वाण तृतीय, पुरस्काराचे मानकरी ठरले.

प्रथम व द्वितीय विजेते राज्य बुद्धिबळ स्पर्धा मधे सहभागी होणार आहे. त्याच बरोबर बेस्ट अंडर 7,9,11, यांना सुध्दा मेडल देण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून क्रियेटीव्ह चेस असोसिएशन चे अध्यक्ष श्री. अश्विन मुसळे सर उपस्थित होते.

 कार्यक्रमाचे आयोजन व मुख्य आरबीटर मा. नरेन्द्र कन्नाके सर यांनी अतिशय महत्वपूर्ण भूमिका सहज पूर्ण केली. स्पर्धा यशस्वी झाल्या बद्दल क्रियेटीव्ह चेस असोसिएशन चंद्रपूर चे कुमार कनकम सर, सर्व उपस्थित पालक, कोच, या सर्वांनी अभिनंदन केलेले आहे.

Share News

More From Author

पुसेगांव पोलिसांनी अवघ्या दोन तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या

उत्तर प्रदेश से हुई गिरफ्तार, हथियारों का बड़ा जखीरा जब्त

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *