झाड तोडल्यास 50 हजारांचा दंड वसुलीचा निर्णय तात्काळ मागे घ्या…उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे

Share News

✒️ संजय तिवारी चंद्रपूर (Chandrapur जिल्हा प्रतिनिधी) 

चंद्रपूर(दि.8 ऑगस्ट) :- झाड तोडल्यास 50 हजार रुपयांच दंड आकारण्यात येणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मारक ठरणार आहे. त्यामुळे हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अन्यथा वनमंत्री मुनगंटीवार यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी दिला आहे. यापूर्वी 1 हजार रुपयांचा दंड आकारला जात होता. त्यामुळे, यापुढे झाडांची कत्तल करताना किंवा झाडे तोडताना होणाऱ्या परिणामाचा विचार करुनच पाऊल उचलायला हवं. विना परवानगी जंगल तोडणाऱ्यांसाठी वन विभागाच हे मोठ पाऊल उचललं आहे.

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये, वन विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून एक झाड तोडल्यास 50 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. या दंडाची तरतूद करणार शासन निर्णय लवकरच पारीत होईल. असे झाल्यास शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसणार असून हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी राजू झोडे यांनी केली आहे.

Share News

More From Author

ट्रक -दुचाकीच्या अपघातात वृत्तपत्र विक्रेत्याचा जागीच मृत्यू

18व्या ग्रामीण कवी संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध चेस्ट फिजिशियन डॉ. राजेंद्र ननावरे उपस्थित राहणार आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *