दागिन्यांची चोरी करणाऱ्या टोळीला अटक

Share News

✒️ शिरिष उगे वरोरा(Warora प्रतिनिधी)

वरोरा(दि.24 जुलै) :-

टेमुर्डा येथील रहिवासी शरद गुघाने यांच्या दुकानात दि.१७जुलै रोजी चोरी झाल्याची तक्रार पोलीस स्टेशन वरोरा येथे देण्यात आली. यात सहा आरोपींना पोलिसांनी अटक करीत मुद्देमाल जप्त केला.

 तालुक्यांतील टेमुर्डा या गावात शरद गुघाणे यांचे चहाचे दुकान आहे, घटनेच्या वेळी दुकानाचे शटर उघडे करुन झोपले असता अज्ञात चोरट्यांनी दुकानातील २६९ग्रमचे सोन्याचे दागिने अंदाजे सहा लाख ७२हजार ५००,एक लाख रू नगदी, ८हजाराचा मोबाईल असा एकूण ७लाख ८०हजार ५००रू मुद्देमाल चोरून नेला. यावरून गुघाने यांच्या तक्रारीवरून कलम 305 भारतीय न्याय सहिता नुसार गुन्हा दाखल केला.

डी. बी. पथक वरोरा, स्थानिक गून्हे शाखा चंद्रपूर, पोलीस स्टेशन कोरपना यांच्या संयुक्त पथकाने चोवीस तासांत तपास करीत प्रदीप संजय शेरकुरे, आकाश नारायण शरकुरे, चिंतामण संजय शेरकूरे, दोन महीला, सर्व रा. पारधी गुडा, थोपटला, कोरपना. विकास काळे, रा. चीनोरा पारधी गूडा,वरोरा. या सर्वांना अटक करून यांच्याकडून ८ सोन्याच्या अंगठ्या, ४सोन्याच्या बांगड्या,१ सोन्याची चपला कंठी, एक जोड सोन्याचे कानातले, २सोन्याची पोत, १सोन्याचा गोफ, २मोबाईल फोन, गुन्ह्यात वापरलेली कार, ॲक्टिवा मोपेड पोलिसांनी जप्त केली आहे. तसेच फरार आरोपी, गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्याचे बाकी आहे.

Share News

More From Author

विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून करावा लागत आहे प्रवास

ग्रामीण भागातील अतिवृष्टीमुळे अनेक मार्ग बंद तर अनेक शेत जमीन पाण्याखाली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *