🔹अतिवृष्टीमुळे शेत पिकांचे मोठे नुकसान पंचनामे करुन तात्काळ शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची नुकसान द्या
✒️मनोज कसारे भद्रावती(Bhadrwati प्रतिनिधी)
भद्रावती (दि.24 जुलै) :- तालुक्यात मागील आठ दिवसापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असल्याने भद्रावती तालुक्यातील सर्व नदी नाले तळे भरून वाहू लागली आहे.सततधार पावसामुळे सर्व परिसर जलमय झाला असून शेतामध्ये पावसाचे पाणी साचले आहे.शेतात असलेल्या पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी राजा अधिक चिंता ग्रस्त झाला आहे.त्याकरिता भद्रावती तालुका ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी नेते सूरज खंगार यांनी केली आहे.
सविस्तर असे आहे की सतत होत असलेल्या आसमानी संकटामुळे शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. अतिदृष्टीमुळे झालेल्या नुकसान शेतकऱ्याची चिंता वाढली आहे.काही दिवसापासून सतत मुसळधार पाऊस असल्यामुळे भद्रावती तालुक्यातील नादी नाले तलाव भरून वाहत असल्यामुळे भद्रावती तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
पुराचे पाणी चक्क शेतातून वाहत असल्याने काही शेतात पाणी देखील साचून राहत आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.यात सोयाबीन तूर कापूस यासारख्या पिकांची माती सह रोपटे वाहून गेली आहेत.त्यामुळे भद्रावती तालुका ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयाची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी नेते सूरज खंगार यांनी केले.






