शिवसेना (उ.बा.ठा.) महिला आघाडीच्या आढावा बैठकिला उत्स्फूर्त प्रतिसाद

Share News

🔹जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वात पक्षाचे कार्य अत्यंत समाधानकारक : सुषमा साबळे

🔸महिला आघाडी जिल्हा संपर्क प्रमुख सुषमा साबळे यांची उपस्थिती

✒️मनोज कसारे भद्रावती (Bhadrwati प्रतिनिधी)

भद्रावती (दि.18 जुलै) :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडी चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख सुषमा साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत वरोरा-भद्रावती विधानसभा महिला आघाडीची आढावा बैठक नुकतीच पार पडली. भावना खोब्रागडे यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या या बैठकिला महिला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला.

 सर्वप्रथम रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच दीप प्रज्वलन करून आढावा बैठकिचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी बैठकिच्या प्रमुख मार्गदर्शक महिला आघाडी जिल्हा संपर्क प्रमुख सुषमा साबळे यांचा सत्कार करण्यात आला.

 जिल्हा संपर्क प्रमुख सुषमा साबळे यांनी या प्रसंगी मार्गदर्शन करतांना सांगितले की, जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वात वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कार्य अत्यंत समाधानकारक सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणूकीत पक्षाला जोरदार जनाधारा मिळविण्यासाठी सर्वांनी एक दिलाने यापुढे सुध्दा कार्य करावे, परस्परात योग्य समन्वय ठेवावा, माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशान्वये सर्व महिला भगिनींनी शिवसेना घराघरात पोहचवावी असे आवाहन केले.

 याप्रसंगी भावना खोब्रागडे यांनी आगामी वरोरा-भद्रावती विधानसभा निवडणूकीत जिल्हा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात शिवसेना (उ.बा.ठा.) पक्ष भरभक्कम यश प्राप्त करेल असा आत्मविश्वास व्यक्त करुन उपस्थित भगिनींना विविध विषयावर मार्गदर्शन केले. या बैठकीत जिल्हा संपर्क प्रमुख सुषमा साबळे यांच्या मार्गदर्शनात विविध विषयांवर चर्चा सुध्दा करण्यात आली.

 या बैठकीत इतर महिलांनी सुध्दा विचार व्यक्त केले. याप्रसंगी महिला पदाधिकारी आशा आगलावे, शीला चामाटे, प्राजक्ता झुंजरे, रूपाली साखरकर, सारिका पथाडे, शालिनी हिवाळे, प्रांजू कांबळे, सोनू शिंदे,वनिता रामटेके, दुर्गा चांदेकर, वैशाली कांबळे, वनिता बडोले, प्रिया गेडाम, नीलिमा तामगाडगे, जयतुरा खोब्रागडे, पूजा सारे, भाग्यश्री खडसे, लक्ष्मी इंगोले, निलम तामगाडगे, सुनिता पठाण, मुन्नी रंगारी, सिंधू ढाले, पूजा गावंडे, योगिता देशमुख, अनिता श्रीवास, रजिया शेख, यास्मिन बानू, नागीण शेख, प्रियंका खोब्रागडे, मनीषा ढाले, पुष्पा बांदुरकर, स्नेहा सॅमवेल, दिया शर्मा आणि नीलिमा खोब्रागडे प्रामुख्याने उपस्थित होत्या. बैठकीचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन भावना खोब्रागडे यांनी केले.

Share News

More From Author

वनमजूर अग्निरक्षक यांच्या मागण्यासाठी बच्चु कडु यांना निवेदनातून साकडे

युवतीने गळफास घेऊन संपवली आपली जीवन यात्रा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *