विक्रमार्कां चित्रपटात धनंजय डोंजेकर यांची खलनायकाच्या भूमिकेत एंट्री

Share News

✒️सारंग महाजन बुलढाणा(Buldhana प्रतिनिधी)

बुलढाणा(दि.17 जुलै) :- पुण्यातील एका सामान्य कुटुंबातून हा कलाकार अतिशय मेहनतीने आणि आपल्या कष्टाच्या जोरावर दिवसेंदिवस चित्रपटसृष्टीत एक एक पाऊल पुढे टाकत आहे. 

               धनंजय डोंजेकर यांनी आयटमगिरी, घर बंदूक बिर्याणी या मराठी चित्रपटात दुर्गा, दुहेरी ,पिंकीचा विजय असो या मराठी सिरीयल मध्ये त्यांच्या महत्त्वाच्या भूमिका अत्यंत प्रभावीपणे पार पडली आहे. अनेक शॉर्ट फिल्म, पथनाट्य ,नाटक यामध्ये सुद्धा त्यांनी काम केले आहे. खलनायक म्हणजे सामान्य भाषेत गुंडाचा रोल मध्ये प्रामुख्याने ते काम करतात. येणाऱ्या त्यांच्या विक्रमार्का या चित्रपटात त्यांची खलनायकाची भूमिका कशी आहे व काय वेगळं पहायला मिळणार आहे.

यासाठी यांचे असंख्य चाहते वाट पाहत आहे.परिस्थितीला झुंज देऊन लढणाऱ्या या कलाकाराला पुढील अनेक चित्रपटांसाठी अनेक चाहते शुभेच्छा देत आहे. तसेच माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समितीचे अमरावती जिल्हा संघटक यांनी सुद्धा धनंजय डोंजेकर यांच्या निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन केले.

Share News

More From Author

बससेवा सुरू करा, अन्यथा कोळश्याची वाहतूक थांबवणार

शिवाई विद्यालय तथा कॉलेज मध्ये वृक्षदिंडी व आषाढवारी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *