पञकार राजु जंगम यांचे बुधवारी प्रथम पुण्यस्मरण

Share News

✒️ संजय तिवारी चंद्रपूर (Chandrapur जिल्हा प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि .9 जुलै) :- चंद्रपूर जिल्ह्य़ातील नामवंत पञकार समाजसेवक राजु जंगम यांचे प्रथम पुण्यस्मरण दि.१० जुलै २०२४ रोज बुधवार स्थळ आपल्या रहात्या घरी जुणोना चौक, हिंग्लांज भवानी वार्ड, बाबुपेट चंद्रपूर येथे आयोजित केले आहेत. 

यानिमित्य जंगम कुंटुबाचा वतीने धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

  स्वर्गीय समाजसेवक पञकार राजु जंगम हे आदर्श पञकार, तसेच आरपीआय आठवले गट पक्षाचे चंद्रपूर शहर अध्यक्ष सुध्दा होते. आपल्या कुटूंबावर त्यांनी चांगले संस्कार केले. 

   प्रथम पुण्यस्मरण निमित्त त्यांनी विविध उपक्रम व धार्मिक कार्यक्रम चे आयोजन केले. चंद्रपूर जिल्हयातील एक शिस्तबद्ध तसेच सामाजिक धार्मिक कार्याची आवड असणारे आणि गोरगरीब आणि वंचित लोकांची सेवा करणारे व्यक्तिमत्व अशी त्यांची ख्याती होती. 

 स्वर्गीय राजु जंगम यांचा भरभक्कम पाठिंब्यामुळे राजकीय, सामाजिक, पञकार अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कुटुंब व मुलगा पञकार संदिप जंगम यांनी यश संपादन केले आहे. दुर्मिळ झालेली कुटूंब पध्दती जंगम परिवाराने एकञ आजही जपुन ठेवलेली आहे. वडिलांचा प्रथम पुण्यस्मरणा निमित्ताने नातेवाईक हितचिंतक मिञ परिवार यांना उपस्थित राहण्याचे आवाहन जंगम परिवाराने केले आहे.

Share News

More From Author

धनगर अधिकारी व कर्मचारी त्रुतीय अधीवेशात वंदना विनोद बरडे अधीसेवीका व सामाजिक कार्यकर्त्या यांचा सत्कार 

ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे “बामणी प्रोटीन्स” प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी काढला यशस्वी तोडगा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *