✒️ संतोष लांडे पुणे(Pune प्रतिनिधी)
पुणे(दि.22 जून) :-
दिव्य कुटुंबाची भेट घडवणारा ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’
शिव तो निवृत्ती । विष्णू ज्ञानदेव पाही । सोपान तो ब्रह्मा । मूळ माया मुक्ताई ।।
असे या भावंडांचे वर्णन संत कान्होपात्रांनी केलंय. या भावंडांच्या संतपणाची महती सांगत मुक्ताईच्या दृष्टीकोनातून संत ज्ञानेश्वरांच्या दिव्य कुटुंबाची भेट घडवणारा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा भव्य आध्यात्मिक मराठी चित्रपट २ ऑगस्टला आपल्या भेटीला येतोय. दिव्य अनुभवाची प्रचिती देणाऱ्या या चित्रपटाची पहिली झलक नुकतीच प्रदर्शित झाली आहे. चित्रपटात बालपणीच्या संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत मानस बेडेकर, मुक्ताईच्या भूमिकेत ईश्मिता जोशी तर निवृत्तीच्या भूमिकेत साहिल धर्माधिकारी आणि सोपानच्या भूमिकेत अभीर गोरे आहे.
महिला संतमालिकेत मुक्ताबाई यांचा जीवनसंघर्ष आणि त्या संघर्षातून आलेली ज्ञानदृष्टी अलौकिक आहे. त्यांच्या श्रेष्ठत्वाचा गौरव सर्वच संतांनी केलेला आहे. हे श्रेष्ठत्व सहज मिळालेले नव्हते, तर त्यासाठी त्यांच्या कुटुंबियांना मोठ्या दिव्यातून जावे लागले. त्यात सर्वांत लहान असलेल्या मुक्ताबाईला खूप मोठी जबाबदारी स्वतःवर घ्यावी लागली. ‘देहरूपाने संपले तरी कार्यरूपाने संजीवन असणाऱ्या मुक्ताबाईंच्या कार्य व विचारांचे सार ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटातून मांडण्यात आले आहे. या चित्रपटाची प्रस्तुती ए.ए.फिल्म्स ही नामांकित वितरण संस्था करीत आहे. रेश्मा कुंदन थडानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
अभिनेते श्री विकास वायाळ यांनी ज्युनियर कॅरेक्टर पंडित या भूमिकेतून संत ज्ञानेश्वर मुक्ताई या चित्रपटात पदार्पण केलं होतं हा त्यांचा पहिलाच चित्रपट तसेच त्यांची पहिली सिरीयल तुझी माझी जमली जोडी या सिरीयल मधून त्यांनी ज्युनिअर कॅरेक्टर म्हणून काम सुरू केलं होतं , बऱ्याच पिक्चर सिरीयल मध्ये हिंदी भोजपुरी मराठी सुरुवातीला ज्युनिअर कॅरेक्टर म्हणून काम केलं होतं, तसेच टाटा मोटर्स व पॉलिटिकल ऍड मध्ये पण त्यांनी ज्युनिअर कॅरेक्टर चे काम केलं होतं.
त्यांच्या ज्युनिअर कॅरेक्टर च्या चांगले अभिनयामुळे सिरीयल मध्ये कॅरेक्टर चे काम भेटत गेली अगदी तीन महिने ज्युनिअर कॅरेक्टर व तीन महिने कॅरेक्टर सहा महिन्याच्या कमी कालावधीत त्यांनी या कलाक्षेत्रात उंच भरारी घेतली आहे उत्कृष्ट असा अभिनय सादर करत आहेत.
अगदी कला रसिकांना मोहन टाकणारा त्यांचा असा उत्कृष्ट अभिनय आहे.अभिनयाबरोबर उत्कृष्ट गायन उत्कृष्ट नृत्य व उत्कृष्ट सूत्रसंचालन पण करतात.