रेल्वे फलाट वर विकलांग शौचालय पण पाणी नाही

Share News

✒️ संजय तिवारी चंद्रपूर (Chandrapur जिल्हा प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि .13 जून) :- बल्लारशाह रेल्वे स्टेशन येथे रेल्वे फलाट वर विकलांग शौचालय असून तिथे पाणी ची व्यवस्था नाही आहे.

          मागील पाच महिन्या अगोदर फलाट एक वर विकलांग प्रवाश्याकरीता शौचालय चे बांधकाम करण्यात आले. तिथे मागील दीड महिन्यापासून पाण्याची व्यवस्था नाही आहे. तिथे पाणीची टाकी असून ते शोभा वाढवत आहे. तसेच बाजूला जीआरपी पोलीस चौकी असून तिथे सुद्धा मागील एक ते दीड महिन्यापासून पाणी ची पुरवठा होत नाही आहे. जीआरपी चौकीत पोलीस बॅरेक व पोलीस कोठडी सुद्धा आहे.

जीआरपी चौकीत शौचालय व बाथरूम ची सोय असून तिथे मागील दीड महिन्यापासून पाणी उपलब्ध नसल्याने त्यांना फलाट वरून पाणी आणावे लागत आहे. तिथे बाहेरून आलेल्या पोलीसांना त्रास सहन करावा लागत आहे. येथील पोलीसांनी या बाबत रेल्वेच्या आयडब्लू अधिकारी ला तक्रार केली पण त्यांच्या हेकेकारी मुळे पाण्याची पुरवठा होत नाही आहे.

Share News

More From Author

समस्या सोडविण्यासाठी आ. समाधान आवताडे मैदानात

वरोरा विधानसभा क्षेत्रात युवासेना नेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसनिमित्त विविध सामाजिक उपक्रम संपन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *