पैशाच्या वादातुन मित्राने केली मित्राची हत्या 

Share News

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.12 मे) :- 

घुगुस येथील देशी दारू दुकान जवळ दारूचे पैसे देण्याच्या वादातुन एका मित्राने दुसऱ्या मित्राला लाथाबुक्यानी मारहाण केली यात त्यांच्या मित्राची हत्या झाल्याची घटना आज सायंकाळी 7.15 ते 7.30 वाजता दरम्यान घडली.

यात मृतकाचे नावं मनोज जयस्वाल असून हत्या करणाऱ्याचे नावं सागर असल्याचे सांगितले जाते.

माहितीनुसार मनोज व सागर हे मित्र असून सागर हा एका कंपनीच्या पार्किंग मध्ये झोपतो व वॉर्ड क्रमांक 2 येथे असलेल्या शिवभोजन मध्ये जेवण करतो.

आज शनिवार ला मालगुजारी तलावजवळ असलेल्या देशी दारू दुकानात मनोज व सागर यांनी दारू प्राशन केली व दारूचे बिल देण्याच्या वादातून तु तु मै मै झाली यात सागर याने मनोज ला लाथाबुक्यानी मारहाण केली. त्याला दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले असता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टनी सागितले.

या घटनेची माहिती पोलिसांना होताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व सीसीटी व्ही चे फुटेज घेतले. व मृतकाचे शव विच्छेद करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पाठविण्यात आले.

Share News

More From Author

अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार 

निधन वार्ता.  अभिमान तुरानकर यांचे दुःखद निधन 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *