आदिवासी बांधवांना मिळणार समानतेचा लाभ 

🔹सरपंच मोहित लभाने

✒️शेगांव बू ( विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क) 

शेगांव बू (दि.1 फेब्रुवारी) :- स्थानिक शेगाव येथून जवळच असलेल्या शेगाव खुर्द येथे सल्ला शक्ती अनावरण सोहळा संपन्न झाला यात गावाचे सरपंच श्री मोहित लभाने युवा सरपंच यांच्या नेतृत्वाखाली अनेक विविध कार्यक्रम घेण्यात येत असतात .

तर आज यात गावातील अनेक जाती पंथाचे लोक सहभागी झाले असून यात प्रत्येक गावात चालत आलेल्या जातीभेद हा कायमचा नष्ट व्हावा गावातील प्रत्येक नागरिकांनी एका कुटुंब प्रमाणे राहावे.

याच सोबत गावात मोजक्या संख्येने असलेले आदिवासी बांधव यांना देखील समानतेचा दर्जा मिळावा यांना देखील प्रत्येक प्रत्येक सुखसोय शासकीय योजना मिळाव्यात .या साठी माझे सदैव प्रयत्न राहील व यांच्यावर कधीही अन्याय होणार नाही . या करिता मी सदैव प्रयत्न शिल त्यांच्या पाठीशी राहील . असे मत श्री मोहित लभाने सरपंच ग्राम पंचायत शेगाव खुर्द यांनी या कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून गावात प्रत्येक जाती पंताचे नागरिक एकत्र राहतील व सर्वांना समानतेची वागणूक मिळेल अशी ग्वाही देण्यात आली .