राळेगावच्या आदर्श दुर्गा महिला मंडळाच्या वतीने रविंद्र शिंदे यांचा सत्कार

🔹मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा; सेवा हाच खरा धर्म; माणूस हीच श्रेष्ठ जात : रविंद्र शिंदे

 ✒️मनोज कसारे भद्रावती (Bhadrawati प्रतिनिधी)

भद्रावती(दि.29 मे) :- सतत दिवसरात्र जनसेवा करीत शेतकरी शेतमजुर यांना नेहमी मदत असलेले तसेच कोवीड-19 कोरोणाकाळात निस्वार्थ सेवा प्रदान करणारे, सन 2022-23 मध्ये पुढाकार घेवुन पुरग्रस्त भागात अन्नधान्य किट वाटुन मदत केल्याबद्दल आदर्श दुर्गा महिला मंडळ राळेगाव पदाधिकारी यांनी स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक तथा शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे यांचा त्यांच्या निवास्थानी शाल श्रीफळ नुकताच शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

 हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेला अनुसरुन तसेच शिवसेना उध्दव बाळासाहेब ठकारे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने 75-वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रामध्ये विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे रविंद्र शिंदे यांचे समाजाकरीता करीत असलेले कार्य, सहकार्य यांचा कुठेतरी गौरव व्हावा हा उदान्त हेतु मनात ठेवून भद्रावती तालुक्यातील राळेगाव येथील आदर्श दुर्गा महिला मंडळ पदाधिकारी सौ. सुवर्णाताई थेरे, सौ. देवकाताई खामनकर, सौ. गिताताई खामनकर, सौ. लताताई रांगणकर, सौ. छायाताई परचाके, सौ. रुखमाताई झाडे, सौ. मालाताई आवारी यांनी मंडळातर्फे यांनी आज रविंद्र शिंदे यांच्या निवासस्थानी शाल श्रीफळ देत सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या भागातील समस्याचे निराकरण करण्यासंदर्भाने विनंतीपुर्वक निवेदन दिले. याप्रसंगी रविंद्र शिंदे यांनी लवकरात लवकर यासंबंधाने निर्णय घेवून समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले.

 स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट, चंद्रपूर ही मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा; सेवा हाच खरा धर्म; माणूस हीच श्रेष्ठ जात ही संकल्पना तसेच ब्रिद वाक्य मनाशी बाळगून दिनदुबळे, शोषित, पीडित, गरीब, गरजू, रुग्ण, दिव्यांग, अनाथ, निराधार व होतकरूनसाठी सातत्याने कार्यरत असलेली परिसरातील सामाजिक ट्रस्ट. ट्रस्टच्या माध्यमातून विद्यार्थी, युवक, खेळाडू, महिला, शेतकरी, शेतमजुर, गरीब, गरजु, अशा विविध क्षेत्रातील जनतेकरीता विविध योजना सुरु करण्यात आलेल्या आहेत.

 ट्रस्टचे अभियान योजना उपक्रम वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभ्यासिका योजना, विदेही सदगुरू श्री संत जगन्नाथ महाराज जनजागृती व प्रबोधन कार्यक्रम, श्रद्धेय बाबा आमटे आरोग्य अभियान, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे दीव्यांग योजना, डॉ. एपीजे अब्दुल कलाम विद्यार्थी कल्याण योजना, अनाथांची माई स्व. सिंधुताई सपकाळ शैक्षणिक पाल्य दत्तक योजना, कै. म.ना. पावडे क्रीडा स्पर्धा आदी विविध योजनांचा लाभ वरोरा विधानसभा क्षेत्रातील तसेच जिल्हयातील विविध गरजूंनी लाभ देण्यात आलेले आहे. तसेच ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले हे स्वता लोकांना ट्रस्टचे उपक्रम अभियान योजना समजावून सांगत असून या योजनांचा लाभ गरीब गरजुनी घ्यावा असे आवाहन वेळोवेळी करीत असतात व गरीब गरजूना लाभ मिळावा यासाठी प्रयत्नशिल असतात.

 याप्रसंगी आदर्श दुर्गा महिला मंडळ राळेगाव पदाधिकारी तसेच राजेश तिखट, सुनिल थेरे, अशोक मारेकर यांच्यासह शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे भद्रावती शहर प्रमुख घनश्याम आस्वले उपस्थित होते.