आनंद निकेतन महाविद्यालयामध्ये 20 एप्रिल पासून ४ थे उन्हाळी योग व क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन 4th summer yoga and sports training camp organized in Anand niketan college from 20th april

✒️ वरोरा (Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा (दि.13 एप्रिल) :- आनंद निकेतन महाविद्यालयाच्या मैदानावर विदर्भातील लोकप्रिय अश्या चौथ्या उन्हाळी योग व क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि.20 एप्रिल 2022 पासून होत आहे. दर वर्षी या शिबिरात तब्बल ७०० ते ८०० शिबिरार्थी क्रीडा प्रशिक्षण घेण्यासाठी सहभागी होतात.

या योग व क्रीडा प्रशिक्षण शिबिरात मैदानावरील वयक्तिक , सांघिक तसेच मैदानी खेळ असे एकून 27 विविध खेळाचे प्रशिक्षण दिले जाते. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू आणि भारतीय पारंपरिक क्रीडा प्रकार या शिबिराचे प्रमुख आकर्षण असतात. या ४ थे उन्हाळी योग व क्रिडा प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी दि.1 एप्रिल पासून आनंद निकेतन महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागांमध्ये नोंदणी करणे सुरू झाले आहे.

वय 8 वर्षा पुढील विद्यार्थ्यांना या शिबीरामध्ये सहभागी होता येणार आहे. तसेच 100 विद्यार्थ्यांसाठी निवासी शिबिराची सोय आयोजन समिती मार्फत करण्यात आली आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी या शिबिरामध्ये आवर्जून भाग घ्यावा असे आव्हान शिबिर आयोजन समिती मार्फत करण्यात येत आहे.