सेल्फीच्या नादात चौघांच्या बुडून मृत्यू  Four people drowned in the sound of selfies

▫️नागभीड तालुक्यामधील घोडाझरी तलावातील घटना(Ghodazari lake incident in Nagbhid taluka)

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव (दि.16 जुलै) :- आज शेगाव येथील काही युवक चिमूर तालुक्यातील मुक्ताबाई येथे धबधब्याच्या आनंद घेण्यासाठी शेगाव येथून सकाळी दहा वाजता दरम्यान गेले होते, परंतु मुक्ताबाई धबधब्या परिसरामध्ये दोन दिवसा अगोदर डोमा येथील रहिवाशी डोमाजी सोनवणे यांच्या वाघाच्या हमल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली…

आज मुक्ताबाई धबधबा वनविभाग तसेच पोलीस प्रशासनाकडून काही दिवसा करीता बंद करण्यात आला असल्याने सदर युवक हे मुक्ताबाई येथून नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलाव येथे गेले असता सेल्फीच्या नादात एक जण घसरून पडले असता त्याला वाचवण्याच्या नादात तिघेजण पडले असुन चौघांचाही जागीच मृत्यू झाला झाला आहे..

मृतांमध्ये मनीष श्रीरामे 26, धीरज झाडे 27, चेतन मांदाळे 17, राहणार शेगाव ,संकेत मोडक 25 चिमूर तालुक्यातील गिरोला येथील रहिवाशी आहे.

घटनास्थळावर नागभीड पोलीस स्टेशन कर्मचारी उपस्थित असून शोध मोहीम कार्य सुरू आहे सायंकाळ चे सात वाजेपर्यंत शोध मोहीम सुरू होती परंतु रात्र होत असल्याने या सर्व मृतकाचे शोध मोहीम उद्या सकाळी करण्यात येईल असे नगभिड पोलीस अधिकारी यांनी दिली ..