रात्रकालीन गांव बैठका:-तालुका कृषी विभागाच्या नाविन्यपूर्ण उपक्रम Night Village Meetings:-Innovative activities of Taluka Agriculture Department

🔸चित्रफीत दाखवून करणार शेतकऱ्यांना मार्गदर्शन(He will guide the farmers by showing video tapes)

  ✒️आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.6 जून) :- यावर्षी पाऊस जुन महिन्याच्या सुरुवातीलाच येणार असा हवामान शास्त्रज्ञाचा अंदाज असतानाच,शेतकरी राजा मोठया जोमाने खरिप हंगामपूर्व कामे करण्यात व्यस्त झाला आहे.अश्यातच सूर्य आग ओकत असल्याने शेतकऱ्यांना सकाळी व सायंकाळी या दोन सत्रात शेतीपयोगी कामे करावे लागते.त्यामुळे कृषी विभागाच्या दिवसा आयोजित गाव बैठकांना व प्रशिक्षणाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता.

      परंतु शेतकऱ्यांना जमीन तयार करणे, बियाणे निवड, लागवड पध्दत, खताचा वापर,तणांचा बंदोबस्त, अन्नद्रव्ये व्यवस्थापन इ.बाबीची माहिती वेळेत पोहोचविणे फार गरजेचे होते.त्यामुळे दिवसभर कार्यालयीन कामे आटपून कृषी विभागाच्या अधिकाऱ्या व कर्मचाऱ्यांनी गावोगावी रात्रकालीन सभा आयोजित करणे सुरू केले आहे.त्यातच प्रोजेक्टर च्या माध्यमातून प्रत्यक्ष चलचित्राद्वारे शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचविली जात आहेत.

याचं अंतर्गत दि.०५-०६-२०२३ ला वरोरा तालुक्यातील मौजा -सोनेगाव येथे मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परीवर्तन (SMART) प्रकल्प अंतर्गत खरीप हंगाम पुर्व शेतकरी प्रशिक्षण संपन्न झाले.सदर प्रशिक्षणामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. डॉ.श्रीकांत अमरशेट्टीवार,संशोधक कृषि संशोधन केंद्र, एकार्जुना यांनी कापूस पिकाकरिता पुर्व मशागत,लागवड पध्दत, बियाणे निवड,अन्नद्रव्ये व्यवस्थापन,तण व्यवस्थापन इ. विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.

प्रमुख अतिथी म्हणून श्री.जी.एस. भोयर, तालुका कृषी अधिकारी, वरोरा यांनी स्मार्ट प्रकल्पाविषयी माहिती देऊन गटामार्फत गाठी तयार करुन विक्री करणे व त्यापासून होणारे फायदे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.श्री.व्ही.पी. काळे, मंडळ कृषि अधिकारी शेगाव(बु) यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली.श्री पवन मत्ते कृषी सहाय्यक व श्री. रोशन डोळस कृषि सहाय्यक यांनी सोयाबीन बिज उगवण क्षमता तपासणी प्रात्यक्षिक करून दाखविले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सौ. तेजस्विनी बुराण सरपंच ग्रा.पं.सोनेगाव उपस्थित होते.अंबुजा सिमेंट फाउंडेशन चे श्री. शुभम आडकीने, प्रशांत लोखंडे आदी प्रतिनिधी उपस्थित होते.सदर प्रशिक्षणास गावातील शेतकरी व महिला शेतकरी गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.