वरोरा शहरात हनुमान जयंतीनिमित्त भव्य रॅली Grand rally on the occasion of hanunan jayanti in warora city

✒️ वरोरा (Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा (दि.7 एप्रिल) :- हनुमान मंदिर देवस्थान जत्रा रोड वरोराच्यावतीने हनुमान जयंती निमित्त वरोरा शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

रॅलीमध्ये महिला व पुरुषांचे भजन मंडळ ढोल ताशा पथक विविध देखावे उंच रथावर हनुमान जी ची मूर्ती विराजमान करण्यात आली होती .

रॅलीमधील भाविकांना वैष्णवी दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने मसाला भाताचे वाटप वैष्णवी दुर्गा उत्सव मंडळाच्या सुनिता चव्हाण रत्ना गुप्ता सविता फुंदे उषा भलमे पूजा चव्हाण ममता सोनेकर आदी महिला सदस्यांनी केले.

 वरोरा शहरातील मुख्य मार्गाने रॅली मार्गक्रम करी हनुमान मंदिर देवस्थान जत्रा रोड येथे पोहोचली हनुमान जयंती निमित्त रॅली बघण्याकरिता वरोरा शहर व परिसरातील नागरिकांनी चांगली गर्दी केली होती.

रॅलीमध्ये सहभागी भाविकांना अनेक सामाजिक संघटनांनी मसाला भात सरबत चे वाटप ठिकठिकाणी करण्यात आले.