महानायक वसंतराव नाईक साहेब यांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुसद नगरी मध्ये राष्ट्रीय बंजारा परिषदेची बैठक संपन्न

🔸सौ.अलंक्रितताई राठोड यांच्या समर्थकांनी प्रचाराचे रणसींग फुंकले,गाव गाव तांडो तांड जाऊन ताईंच्या जिंकण्यासाठी प्रयत्नशील होण्याची ग्वाही दिली

✒️ यवतमाळ (Yavatmal विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

यवतमाळ (दि 7मार्च ) :- 6 मार्च रोजी धर्मनेता किसनभाऊ राठोड यांनी स्थापण केलेल्या राष्ट्रीय बंजारा परिषदेची पुसद नगरीत कार्यकर्ता बैठक संपन्न पुसद परिसरातील विचारवंत,सरपंच, ग्रामपंचायत सदस्य,नायक कारभारी यांची प्रमुख उपस्थिती होती.या बैठकीचे अध्यक्षस्थानी तांडा वस्ती सुधार समितीची रूपेशभाऊ जाधव हे होते व या बैठकिला पुसद तालुक्यातील प्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉ अरूनभाऊ राठोड,महापंचनामा न्युज चे संपादक सतिश भाऊ सेवाळकर,बएलगव्हआन गावाचे सरपंच कट्ठे साहेब,सिंगद सहकारी सोसायटची चेयरमन बाबुराव राठोड, राष्ट्रीय बंजारा *परिषदेचे राज्य संघटक किसन जाधव,यवतमाळ जिल्हाध्यक्ष गोर बाळुभाऊ राठोड,संजय आडे,जीनकरभाऊ राठोड,प्रताप नायक सिंगद,प्रकाश राठोड माजी सरपंच यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली.

  या बैठकित संत सेवालाल महाराज व महानायक वसंतराव नाईक साहेबांच्या प्रतीमेचे पुजन करून बैठकीची सुरूवात झाली.अध्यक्षीय भाषणात रूपेशभाऊ जाधव यांनी सांगीतले की पुसद तालुक्यातील सर्व नागरिकांनी धर्मनेता किसनभाऊ राठोड यांच्या तत्वांचे अंगीकार करायला हवे व त्यांच्या परिवारातील सदस्य सौ.अलंक्रितताई राठोड यांना जर यवतमाळ वाशिम लोकसभेची उमेदवारी मिळाली तर आपण सर्व ताईंना प्रचंड मतांनी नीवडुण आणण्याचा संकल्प करूया.राज्य संघटक किसनभाऊ जाधव यांनी सांगीतले की धर्मसत्तेच्या मार्गाने चालण्यासाठी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे कार्य सुरू आहे व युवकांनी स्वतः समाज परिवर्तनाच्या मार्गाने चालायला हवे व सर्वांनी एकजुटीने हात मिळुन बंजारा समाजाला राजसत्तेत मजबुती करन मिळविण्यासाठी सजग व्हायला हवे अलंक्रितताई राठोड यांच्या स्वरूपात यवतमाळ वाशिम लोकसभेला सक्षम उमेदवार मीळत आहे व त्यांचा सारखा उमेदवार आपल्या मिळणे आपला स्वभाग्य आहे त्यांच्या माध्यमातून यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघात औद्योगीकरनाची सुरूवात होणार आहे.निर्भीड समाजसेवक सतिश भाऊ सेवाळकर यांनी सांगीतले की आज पुसद तालुक्यातील अनेक तांडे हे विकासाच्या भरपुर लांब आहे जर सौ.अलंक्रितताईं सारखा उमेदवार या मतदार संघाचा खासदार झाला तर विकासाची लाठ येणार.

 गोर बाळु भाऊ राठोड यांनी सांगीतले की माझ्या कार्यकर्तांना जेव्हा जेव्हा माझी सात हवी मी तुमच्या सोबत राहणार,मी फक्त आणि फक्त धर्मनेता किसनभाऊ राठोड यांच्या विचाराने चालणारी कार्यकर्ता आहे आणि त्यांच्या विचारांचे चालणाऱ्या कार्यकर्तांनी ऐक फौज मी बनविणार व समाजाला न्याय मिळविण्याचा लढ्यात सहभागी नोंदविणार

 या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सचिन जाधव सर यांनी केले व आभार प्रदर्शन विलास राठोड तुळसीनगर यांनी केले.

या बैठकित बाबुराव पवार,विजय राठोड,पंडितभाऊ पवार,राहुल राठोड,अतुल राठोड,संजय जाधव,आकाश जाधव,बाळु चव्हाण मोहा,श्याम राठोड,केशव आडे,रंजीत चव्हाण,श्रावन जाधव,दत्ता रूणवाल सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.