चिमूर पंचायत समितीच्या घरकुल विभागांचा भोंगळ कारभार…प्रहार सेवक विनोद उमरे यांचा आरोप

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.4 मार्च) :- महाराष्ट्रात चिमूर क्रांती नावाजलेला असून या भूमीत शासकीय अधिकारी यांचा मनमानी कारभार चालतात. पंचायत समिती चिमूर घरकुल विभागात घरकुल प्रमाणपत्र दिले की अधिकारी पंधरा – पंधरा दिवस एक-एक महिना किवा त्या पैशा अनेक दिवस घरकुलाचे अनुदान वितरित करत नाहीत.त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.

तालुक्यातील परिसरातील अनेक ग्रामीण भागात रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना या योजनेची कामे मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात सुरू आहे.घरकुल योजनेचे अनुदान न मिळाल्याने लाभार्थ्यांना बँकेच्या चक्कर मारावा लागत आहे. त्यामुळे त्या पंचायत समितीमध्ये अधिकारी कर्मचारी आपले कर्तव्य जबाबदारीने प्रामाणिक पणे बजावताना दिसत नाही.या पंचायत समितीवर गट विकास अधिकाऱ्यांची कोणतेही वचक दिसून दिसून येत नाही.असे प्रहार सेवक विनोद उमरे यांनी सांगितले आहे.

चिमूर क्रांती भूमी शासकीय पंचायत समितीमध्ये शासनाचे नियम नेहमी कोडमोडली करतात. वरिष्ठ अधिकारी लक्ष देताना दिसत नाही.त्यामुळे जनसामान्य नागरिकांना यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याला जबाबदार कोण ? वरिष्ठ अधिकारी यांना चिमूर पंचायत समितीच्या घरकुल विभागांकडे जातीने लक्ष देण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून व प्रहार सेवक विनोद उमरे यांनी केला जात आहे.