धनगर अधिकारी कर्मचारी संघटन ची आमसभा तसेच प्रबोधन मेळावा

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.4 मार्च) :- दि.03.03.2024 ला धनगर अधिकारी कर्मचारी संघटन ची आमसभा तसेच प्रबोधन मेळावा खेडूळे कुणबी समाज मंडळ सभागृह चंद्रपूर येथे पार पडली. सभेचे अध्यक्ष स्थान श्री. हेमंत ढोले, प्रमुख मार्गदर्शक श्री. अनिलकुमार ढोले , राज्य अध्यक्ष , ध. अ. क.स. महाराष्ट्र राज्य.यांनी भूषविले , प्रमुख उपस्थिती मध्ये सन्माननीय सर्व श्री. Dr. मंगेश गुलवाडे, विलास डाखोळे, शरद उरकुडे, सुनील घोडे, सुधाकर घोरपडे, , संजय बोधे, कैलास उराडे, सौ. नेहा सरोदे होते, कार्यक्रमाचे संचालन श्री. अमोल जतकर, प्रास्ताविक श्री.सुनील पोराटे, आभार प्रदर्शन श्री. रुपेश चिडे यांनी केले. उपस्थित पाहुणे यांनी संघटन वाढी साठी सखोल मार्गदर्शन केले.

यामध्ये प्रामुख्याने संघटनेचे सभासद वाढविने , धनगर आरक्षण यावर सखोल चर्चा , चंद्रपूर शहर येथे समाजाची वास्तू करण्यासाठी प्रयत्न करणे, अमरावती येथे संघटनेचे एप्रिल मध्ये होणाऱ्या त्रैवार्षिक राज्य अधिवेशन निमित्ताने प्रसिध्य होणाऱ्या स्मरणिका मध्ये जाहिराती,लेख देण्याबद्दल अश्या विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन व चर्चा करण्यात आली. त्यानंतर राज्य अध्यक्ष मा. श्री. अनिलकुमार ढोले यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा झाली, त्यामध्ये नवीन जिल्हा कार्यकारिणी गठित करण्यात आली. त्यामध्ये श्री.हेमंत ढोले यांची सर्वानुमते राज्य पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आली.

तसेच श्री.संजय बोधे (वरोरा) यांची जिल्हा अध्यक्ष, श्री. सुनील पोराटे, कार्या अध्यक्ष, श्री. रुपेश चीडे सचिव, श्री. अमोल जतकर कोषाअध्यक्ष, तसेच विभाग निहाय उपाध्यक्ष सर्वश्री. कैलास उराडे,(राजुरा, बल्लार्शाहा) अमोल मोंढे, उत्तम रोकडे (उर्जानगर), निलेश काळे(चंद्रपूर शहर), प्रभाकर ढाले(वरोरा,भद्रावती), व सहसचिव/संघटन सचिव श्री.पुरुषोत्तम फटकाळे यांची निवड करण्यात आली, अश्या प्रकारची यावर्षी साठी जिल्हा कार्यकारिणी गठित करण्यात आली.

त्यानंतर जिल्हा कार्यकारिणी ही तालुकानिहाय कार्यकारणी गठित करतील असा ठराव झाला. त्यानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. अश्या प्रकारे कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सदर कार्यक्रमास उर्जानगर मधील सन्माननीय अभियंता, कर्मचारी, अधिकारी हे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यात सर्वश्री.मयूर भोकरे, प्रवीण गिलबिले, पवन ढवळे, यांचे मोलाचे योगदान राहिले. सर्वांचे खूप खूप आभार.