कोठारी-आक्सापुर मार्गावर भीषण अपघात

Share News

🔹तिघांचा जागीच मृत्यू 

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर.(दि.5 फेब्रुवारी) :- चंद्रपूरला जाणाऱ्या दोन दुचाकींना विरुद्ध दिशेने कोठारीकडून सुरजागडला लोह खनिज आणण्याकरिता जाणाऱ्या हायवाने जबर धडक दिली यात तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी दि. ४ फेब्रुवारी ला दुपारी बारा वाजता कोठारी-आकसापूर दरम्यान मंदिराजवळ घडली.तिघेही मृतक गडचिरोली जिल्ह्यातील मूलचेरा तालुक्यातील असून मनोज सरदार,अमृतोष सरकार व शैलेंद्र रॉय असे मृतकाचे नावे आहेत.

    आल्लापल्ली-बल्लारपूर राष्ट्रीय महामार्गावर सुरजागढ येथून दिवस रात्र लोह खनिज कच्चा मालाची वाहतूक सुरू आहे.२४ तासात हजारो अवजड वाहनांची सुसाट वर्दळ सुरू असते त्यामुळे या मार्गावर अपघात नित्याची बाबा बनली आहे. या आधी अनेक अपघात या मार्गावर घडले आहेत.

अनेकांना जीव गमवावा लागला असून काहींना अपंगत्व आले तर अनेकांचे कुटुंब उध्वस्त झाले आहेत.मात्र या भरधाव अवजड वाहनावर कोणत्याही विभागाने नियंत्रण आणण्याचे प्रयत्न केले नाही.असे असताना सुरजागडच्या हायवाने दोन दुचाकीस्वारास चिरडल्याची घटना आज घडल्याने सुराजागड खणीचे वाहन अजुन किती बळी घेणार असा प्रश्न नागरीकांना पडला आहे.सतत घडणाऱ्या अपघाताने कोठाती गोंडपीपरी तालुक्यातील जनतेत भीती निर्माण झाली असून दुचाकी,चारचाकी वाहन चालक हैराण झाले आहेत.

   चंद्रपूर कोठारी मार्गावरील आक्सापूर येथील मंदिरासमोर सुरजागड कडे जाणारा हायवा क्र.एम.एच.४० सी.एम.३२३३ ने 

एम.एच.३३ के ६७३९ व एम.एच.३४ ए.जी.३२२४ या क्रमांकाच्या दोन दुचाकींना रविवारी दुपारच्या १२.०० वाजताच्या दरम्यान हायवाने धडक दिली व भीषण अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली.घटनेची माहिती कोठारी व गोंडपीपरी पोलिसांना होताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले.मृतांना उत्तरीय तपासणीसाठी बल्लारपूर सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

शैलेंद्र कालिप्त रॉय वय ६३ वर्ष रा.विजनगर,अमृतोष सुनील सरकार वय ३४ कालीनगर व मनोज निर्मल सरदार वय ४३ विजयनगर मूलचेरा जिल्हा गडचिरोली असे मृतकाची नावे आहेत. पुढील तपास कोठारी व गोंडपिंपरी पोलीस करीत आहेत. घटना घडताच हायवा चालकानी घटनास्थळावरून पसार झाला असून चालकाचा शोध पोलीस घेत आहेत.

Share News

More From Author

चंदनखेडा येथे समाज प्रबोधन कार्यक्रमात आदिवासी पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळा संपन्न

देवराव भोंगळे यांच्या उपस्थितीत. गाव चलो अभियान नियोजन बैठक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *