व्हॉइस ऑफ मीडिया चिमूर च्या वतीने पत्रकार दिन साजरा

🔸पोलीस निरीक्षक मनोज गभणे यांची उपस्थिती

✒️चिमूर(Chimur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चिमूर.(दि.7 जानेवारी) :- 

       स्व. बाळशास्त्री जाभेकर यांचे प्रतिमेचे पूजन करून स्वागत समारंभाने कार्यक्रमाची सुरवात झाली. यावेळी पोलीस निरीक्षक मनोज गभने व पत्रकार जितेंद्र सहारे यांनी विचार वक्त केले.

       शहीद बालाजी रायपूरकर सभागृहात झालेल्या कार्यक्रम मधील मंचावर ठाणेदार मनोज गभणे,व्हॉइस ऑफ मीडिया चिमूर तालुका अध्यक्ष रामदास हेमके, पत्रकार योगेश सहारे, चिमुर प्रेस मिडीया फाऊंडेशन, चिमुर चे अध्यक्ष पत्रकार पंकज मिश्रा उपस्थित होते.

संचालन बालू सातपुते, प्रास्ताविक विलास कोराम तर आभार योगेश सहारे यांनी व्यक्त केले.

यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया चे जिल्हा सदस्य प्रमोद राऊत, योगेश सहारे, भरत बंडे राजु रामटेके, रामदास ठुसे,उमेश शंभरकर, जावेद पठाण, फिरोज पठाण,संजय नागदेवते, पंकज मिश्रा,राजेंद्र जाधव, शुभम बारसागडे नितीन पाटील,गुणवत चटपकर, जितेंद्र गाडगे,सुनील कोसे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.