राज्यस्तरीय प्रेरणा शिबिरासाठी चंद्रपूर जिल्यातून निकिता ची निवड

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि .15 फेब्रुवारी) :- येथील आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन वरोरा येथील एम. ए. समाजशास्त्र द्वितीय वर्षाला शिक्षण घेत असलेली राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ट स्वयंसेविका कु.निकिता गजानन माणूसमारे या विद्यार्थीनीची राज्यस्तरीय प्रेरणा शिबीरासाठी चंद्रपूर जिल्यातून निवड झाली असून दि.17 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी पर्यंत कर्जत येथील होणाऱ्या निवासी शिबिरात सहभागी होणार आहे.

        गोंडवाना विद्यापीठातून चार विद्यार्थ्यांची निवड झाली असून चंद्रपूर जिल्यातील दोन विद्यार्थी असून एक विद्यार्थीनी निकिता माणूसमारे व दुसरा सुशीलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क पडोली, चंद्रपूर चा बी. एस. डब्लू तृतीय वर्षाचा विद्यार्थी निखिल भडके ची निवड झाली आहे.या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. मोक्षदा नाईक विभागीय समन्व्यक प्रा.डॉ रंजना लाड व प्राचार्य डॉ. मृणाल काळे यांचे निकिता ने आभार मानले.निकिता ने यापूर्वी देखील असे अनेक शिबिरात भाग घेतलेला असून महाविद्यालयात निकिता चे खूप कौतुक केल्या जात आहे.