शेगाव ते चिकणी रस्त्याला “मौत का कूवा ” घोषित करा Declare the Shegaon to Chikani road “Maut ka Kuwa”

▫️रस्त्याचे तात्काळ काम करावे अन्यथा बांधकाम विभागाला टाळा ठोकणार :-अभिजित कुडे(The road work should be done immediately otherwise the construction department will avoid knocking :-Abhijit Kude)

✒️ चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्युज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.14 जुलै) :- वरोरा तालुक्यातील सर्व रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्डय़ात रस्ते हे देखील समजत नाही आहे. लोकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे.

उखर्डा ते नागरी, शेगाव ते चिकणी, महाडोळी ,गीरसावळी या गावातील रस्त्याच्या मागणीसाठी अनेक वेळा निवेदन दिले. बांधकाम विभाग, तहसीलदार यांना निवेदन देवून देखील प्रशासन झोपेत आहे. आंदोलन केले तर फक्त उखर्डा रस्त्याचे 1 वेळा फक्त खड्डे बुजविण्यात आले ते पण व्यवस्थित केले नाही. परिसरातील रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्त्यातील पुलाच्या वर भगदाड पडले आहेत.

चिकणी पर्यंत जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला खड्डे पडले आहेत. अक्षरशः रस्त्याची चाळण झाली आहे. जुन्या गिट्टी सुद्धा बाहेर आली आहे. पायदळ प्रवास करणे देखील कठीण झाले आहे. या रस्त्याच्या दुरुस्ती साठी 2 निवेदन दिले तरी पण प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नाही. जिवितहानी झाल्यास प्रशासकीय अधिकारी जबाबदारी घेणार काय असा सवाल अभिजित कुडे यानी केला आहे. शेगाव येथे तर 3 फुट पर्यंत चे खड्डे पडले आहेत. संपूर्ण रस्त्याची दुर्दशा झाली आहे.

पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळे रस्त्यातील खड्डय़ात पाणी साचले आहे, वाहनचालकांना पाण्यामुळे खड्डाचा अंदाज येत नाही, महाडोळी रस्ता तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान करण्यात यावा असा झाला आहे. उखर्डा रस्त्यासाठी गेल्या 2 वर्षात कित्येक निवेदन अनेक आंदोलन करून प्रशासन झोपा काढत आहे. आता तीव्र आंदोलन करण्यात येईल व काही अनुचित प्रकार घडला तर त्याला सर्वस्वी जबाबदारी प्रशासन चि राहणार.