लहानपणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये मैदानी खेळ रुजवण्याची गरज….आ.प्रतिभा धानोरकर

✒️मनोज कसारे भद्रावती(Bhadrawati प्रतिनिधी)

भद्रावती.(दि.28 जानेवारी) :- आजकाल प्रत्येक मुलांना लहानपणापासून मोबाईलचे वेड लागले आहे. या लहान मुलांचे मैदानी खेळाकडे सतत दुर्लक्ष होत असल्यामुळे त्यांच्या शरीराच्या सुदृढपणावर विपरीत परिणाम होत आहे.लहान मुलांच्या सुदृढ आरोग्यासाठी मैदानी खेळ आवश्यक आहे. या लहान मुलांमध्ये त्यांच्या शालेय अवस्थेपासूनच मैदानी खेळाची आवड निर्माण करणे गरजेचे आहे.

प्रत्येक शाळेने विद्यार्थ्यांमध्ये मैदानी खेळाची आवड निर्माण करून त्यांच्या निरामय आरोग्याकडे लक्ष द्यावे यासाठी पालकांनी सुद्धा प्रयत्न करावे असे प्रतिपादन आमदार प्रतिपादन धानोरकर यांनी केले. शहरातील हुतात्मा स्मारकाच्या प्रांगणात युरो लिटल स्कूलतर्फे एक दिवसीय क्रीडा सत्राचे आयोजन करण्यात आले. त्यात त्या बोलत होत्या. यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर, कुमुद हेमके,किशोर हेमके, युरो लिटल स्कूलचे सीईओ व संस्थापक अध्यक्ष अक्षय हेमके,अभि हेमके, कोमल नागोसे,चंद्रशेखर नायरष संगीता खोब्रागडे, कल्याणी पांडे, आकांक्षा रामटेकेष दिव्यता लोणकर, वैशाली शिरपूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शाळेतील लहान मुलांच्या मैदानी खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. यात रस्सीखेच,चेंडू फेकष सिंगल रनिंग, डबल रनिंग, तथा अन्य खेळांचा समावेश होता. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सुद्धा आपल्या भाषणातून मैदानी खेळाचे महत्व विषद केले. सदर क्रीडा स्पर्धेला पालक तथा इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.