टेमुर्डा येथे विलास नेरकर यांच्या हस्ते क्रिकेट सामन्याचे थाटात उद्घाटन

✒️वरोरा (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा (दि.14 जानेवारी) :- युवा स्पोर्टींग क्लब टेमुर्डा द्वारा आयोजित रात्रकालीन हात पीच टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. याचा उदघाटन सोहळा नुकताच संपन्न झाला .

असून उदघाटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस चे विलास नेरकर तर अध्यक्ष म्हणून टेमुर्डा ग्रामपंचायतच्या सरपंच सूचित ठाकरे व प्रमुख पाहुणे म्हणून तंटामुक्ती अध्यक्ष पुष्पाताई तामगाडगे,विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष राजू तिखट ,पिजदुरांचे उप सरपंच , ग्रामपंचाय सदस्य तुळशीराम आगलावे , पोलीस पाटील पंढरी देवगडे व असंख्य नागरिक उपस्तिथ होते . यावेळी उपस्थतीत मान्यवरांनीसुद्धा क्रिकेट सामन्याचा खेळून आनंद घेतला होता.