🔹चंद्रपुर शहरातील पाच स्केटर्सनी आंतरराष्ट्रीय एण्ड्युरन्स स्पर्धेत 15 आंतरराष्ट्रीय पदके जिंकून जागतिक दर्जावर नाव कोरले
✒️ चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपुर (दि.3 डिसेंबर) :- भारत, श्रीलंका, यूएई, मालदीव आणि केनिया या पाच देशांच्या सहभागासह आंतरराष्ट्रीय एण्ड्युरन्स चॅलेंज 18,19 नवम्बर 2023 स्पर्धा नुकतीच याक पब्लिक स्कूल, खोपोली, मुंबई येथे पार पडली. इंडियन एण्ड्युरन्स फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने एण्ड्युरन्स वर्ल्ड फेडरेशनने ही स्पर्धा आयोजित केली होती. भारत, श्रीलंका, मालदीव आणि केनिया या देशांतील सुमारे पाचशे स्केटर सहभागी झाले होते.
या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत AMEYA स्केटिंग अकादमीच्या चंद्रपुर 12 स्केटर्सची टीम इंडियामध्ये निवड झाली होती. भारतीय संघामध्ये (AMEYA स्केटिंग अकादमीच्या) SAMIR DHURVE,DHERYA WARFADE,RUDRA KULMETHE, BHASKAR ROY, VAIBHAV DHURVE,OZAIR RHAMAN,RISHABH DHEHARIYA,AAMIN SHEIKH, RESHAM FULSANGE, SHRAVYA GHODMARE,ARUSH NAGAPURE,SAHITTI WADHAI
यांची निवड झाली होती. दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय एण्ड्युरन्स स्पर्धेच्या पहिल्या दिवशी देशासाठी 10 पदके आणि दुसऱ्या दिवशी 5 पदके, अशी 15 पदके मिळवून मोठे यश संपादन केले. 15 कांस्यपदकांचा समावेश आहे. पदकतालिकेत श्रीलंका दुसऱ्या स्थानी, तर मालदीवचा संघ तिसऱ्या स्थानावर राहिला. केनिया संघ चौथ्या, तर मालदीवचा संघ पाचव्या क्रमांकावर होता. आंतरराष्ट्रीय कामगिरीबद्दल विजेते स्केटर्स आणि प्रशिक्षक आतिश धुर्वे यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे..