प्रेमी युगल जोडपे अडकले विवाह बंधनात

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.27 डिसेंबर) :- स्थानिक शेगाव येथून जवळच असलेल्या आष्ठा येथे तंटामुक्त समितीच्या पुढाकाराने प्रेमियुगल विवाह बंधनात अडकले.त्यांचा विवाह आष्टा येथील समिती पदाधिकाऱ्यांनी लावून दिला. आष्टा येथील गजानन भाऊराव कारमेंगे(26)व तेथील किरण राजू गुरुनुले(24)यांनी तंटामुक्त समिती कडे लग्न लावून देण्याची विनंती केली होती.

त्या नुसार महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष दिवाकरजी शेंडे यांनी दोघांची कागदपत्रे तपासून त्यांचा विवाह माँ माणिका मंदिर येथे पंचासक्षम लावून दिला.यावेळी सरपंच चांगदेव भाऊ रोडे,सुहास बहिरे पोलीस पाटील, निखिल तिवाडे, किशोर कावडे, हरीश राजु,कारमेगे, संजय ददमल, चेतन कारमेंगे, तसेच गावातील इतर नागरिक उपस्थित होते.