रॉयल क्रिकेट क्लब विजयी

✒️लखन केशवानी वरोरा(Warora प्रतिनिधी)

वरोरा (दि.14 फेब्रुवारी) :- साई क्रिकेट क्लब मालवीय प्रभाग वरोरा च्या वतीने आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत रॉयल क्रिकेट क्लब वरोराचा संघ विजयी ठरला.

द्वितीय साई क्रिकेट क्लब तृतीय एक अर्जुना क्रिकेट क्लब चतुर्थ बोर्डा क्रिकेट क्लब विजयी झाले वरोरा भद्रावती विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष विलास नेरकर यांच्या अध्यक्षतेखाली बक्षीस वितरण करण्यात आले .

यावेळी चंद्रकांत कुंभारे जेके मेश्राम मंगल पिंपळ शेंडे बंडू लभाने दत्ता बोरीकर बंडू कातोरे 24 तास सेवा ग्रुप चे अध्यक्ष लखन केशवानी मनोज गुप्ता निखिल गाडमोडे अमर गुप्ता प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते स्पर्धा यशस्वी करण्याकरिता साई क्रिकेट क्लबचे अध्यक्ष कल्पक ढोरे उपाध्यक्ष सतीश पिंपळ शेंडे सचिव रितिक मानकर व पदाधिकाऱ्यांनी तसेच सदस्यांनी सहकार्य केले.