शांतता कमेटी व पोलीस स्टेशन तफे आयोजित गरबा स्पर्धा संपन्न 

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बु (दि.25 ऑक्टोबर) :- मध्ये दि. २२ ऑक्टोबर ला शांतता कमेटी व पोलीस स्टेशन यांचे संयुक्त विद्यमाने नेहरू विद्यालयच्या भव्य प्रांगनामध्ये आयोजित करण्यात आला होता. या मध्ये गावातील १८ मंडळानी सहभाग घेतला होता. व सगड्यांनी एकापेक्षा एक असा उत्तम असा गरबा नृत्त सादर केले.

त्या साठी प्रत्येक मंडळाला मार्केट चा राजा गणेश मांडला तर्फे प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले. या कार्यकामाचे अध्यक्ष शेगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार अविनाश मेश्राम हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नेहरू विद्यालय चे प्राध्यापक विजय वारे व पोलीस स्टेशन शेगाव चे पी. एस. आय. सरोदे हे होते.

कार्यक्रमाचे पर्यवेक्षक म्हणून प्रियंका मेश्राम सेंट अणेस कॉन्व्हेंट वरोरा, व सुनीता वारे आनंद निकेतन कॉलेज हे उपस्थित होते. कार्यकामाचे संचालन सुधीर चिकटे यांनी केले तर आभार पेटकर यांनी मानले. विशेष म्हणेज या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण व कुणाचा पहिला, दुसरा नंबर आला हे अजूनही गूढ ठेवण्यात आले आहे.