नायगाव ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंचानी आमचा सत्कार केला हे आमचं भाग्य समजतो..सिने आभिनेता राजेश गायकवाड  We feel lucky that naigaon gram panchayat sarpanch upsarpancha felicitated us.cine actor Rajesh gaikwad

✒️ सुनिल भोसले पुणे (pune प्रतिनिधी)

पुणे (दि.25 मार्च) :- गावातील गावपण व गावच्या माणसातील माणूसपण हे काल मला अनुभवायला मिळालं.. बतावणीच्या निमित्तानं मी व माझा जोडीदार संजय सदगिर भोरला( पुणे ) गेलो होतो, आमचा शो होता रात्री ११.०० वाजता सुरू होणार होता पण आम्ही मुंबई वरून सकाळी ६.००वाजताच आम्ही पुण्यासाठी निघालो ते थेट नायगाव ता. हवेली जिल्हा पुणे सकाळी ११.०० वाजताच पोहोचलो.. त्याचं कारण असं की गेल्या पंधरा दिवसापूर्वी मारुती कटके यांच्या माध्यमातून उत्कृष्ठ पत्रकार आणि दुसऱ्यांच्या यशासाठी सदैव झटनारे… माझे परम मित्र आदरणीय सुनीलजी ज्ञानदेव भोसले यांच्याशी फक्त फोनवरच भेट झाली होती.

त्यानी ह्या पंधरा दिवसात संपूर्ण देशातील बहुतेक पेपर मध्ये माझी कला गुणांची स्थुती केली… ते मला म्हणाले कि तुम्ही कधी पुण्याला आलात तर घरी या.. तो काल योग जुळुन आला… पण काल त्यांच्या घरी गेल्यावर त्यांच्या वहिनी समाजसेविका सुरेखा ताई तुकाराम भोसाले यांनी प्रथम आमची पूजा केली आणि नंतर गावचे सरपंच जितेंद्र (माऊली )चौधरी उपसरपंच उत्तम दादा शेलार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले . तुकाराम भोसले यांच्या निवास्थानी .सिनेअभिनेता राजेश गायकवाड यांनी बऱ्याच नाटकात व मराठी सिरीयल मध्ये कामं केलीत.

बाळूमामा सिरील ठिपक्याची रांगोळी झी सिनेमा मराठी चित्रपट इत्यादी छोटया मोठया पडद्यावर काम केले विशेष म्हणजे सर्व्हिस पाहून वेळात वेळ काढून हे काम करता सिने आभिनेता संजय सदगीर छोटे काम रोल करतात उपस्थित आदर्श माता शेवराई ज्ञानदेव भोसले व सुजाता ज्ञानदेव भोसले नायगाव ग्रामपंचायतचे सफाई कामगार बापू हगवणे