✒️ मनोज कसारे भद्रावती(Bhadravati प्रतिनिधी)
भद्रावती(दि.11 जुलै) :- शिवसेना ( उद्धवं बाळासाहेब ठाकरे) सन्मानीय युवाप्रमुख आदित्य साहेब ठाकरे, युवासेना सचिव वरून जी सरदेसाई यांच्या प्रेरणेने, मुंबई सिनेट सदस्या तथा कार्यकारीणी सदस्या शीतलताई देवरुखकर शेठ,कार्यकारीनी सदस्य हर्षलजी काकडे ,युवासेना विभागीय सचिव तथा सिनेट सदस्य गोंडवाणा विद्यापीठ निलेशजी बेलखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली,
वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख रवीभाऊ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये,जगप्रसिद्ध महारोगी सेवा समिती आनंदवन वरोरा, संचालित *निजबल शिक्षा निकेतन* येथे दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या मागणीनुसार शैक्षणिक साहित्य – नोट बुक वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा युवती अधिकारी प्रतिभा मांडवकर, जिल्हा युवती समन्व्यक अश्लेषा जीवतोडे भोयर, स्वाती ठेंगणे, तेजस्विनी चंदनखेडे, स्नेहा किन्नाके, प्रा.प्रीती पोहाणे कामडे, निखिल मांडवकर, अभिजीत कुडे ई.युवासेनेच्या पदाधीकाऱ्यांच्या हस्ते हा उपक्रम राबविण्यात आला.
